आता घरबसल्या अशी करा Ration Card eKyc- अतिशय सोपी पद्धत

आता घरबसल्या करा अशी करा Ration Card eKyc- अतिशय सोपी पद्धत

Ration Card eKyc – रेशन कार्ड हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाच दस्तऐवज आहे, ज्यामुळे आपल्याला स्वस्त दरात धान्य मिळत. पण जर तुम्ही तुमच्या Ration Card eKyc वेळेवर पूर्ण केली नाही, तर तुमच रेशन कार्ड बंद होऊ शकत किंवा तुम्हाला धान्य मिळण बंद होऊ शकत. ही एक गंभीर बाब आहे, कारण रेशन कार्डमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो. सुदैवाने, आता तुम्हाला रेशन दुकानात जाऊन रांगा लावण्याची गरज नाही. शासनाने ‘Mera Ration’ आणि ‘Mera eKyc’ या ॲप्सच्या मदतीने घरबसल्या केवायसी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

WhatsApp Group Join Now

Ration Card eKyc करणे का गरजेच आहे ?

Ration Card eKyc च मुख्य कारण म्हणजे शासकीय योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण. अनेकदा अस होत की, रेशन कार्डमध्ये चुकीची माहिती असते, किंवा काही जणांनी बनावट रेशन कार्ड बनवलेल असत. यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचत नाही. म्हणूनच शासनाने रेशन कार्डची केवायसी अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला रेशन मिळणार नाही, अस शासनाने स्पष्ट सांगितलेले आहे.

जर तुम्ही ही eKyc वेळेवर केली नाही, तर तुमच रेशन कार्ड रद्द होऊ शकत, आणि तुम्हाला स्वस्त दरात धान्य मिळण बंद होईल. पण घाबरण्याच कारण नाही, कारण आता ही प्रक्रिया घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने करता येते. Mera Ration आणि Mera Ekyc या ॲप्समुळे तुम्ही काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

मेरा रेशन आणि मेरा ई-केवायसी ही भारत सरकारने सुरू केलेली ॲप्स आहेत, ज्यांचा मुख्य उद्देश रेशन कार्डशी संबंधित सेवा सोप्या आणि पारदर्शक करण हा आहे. मेरा रेशन ॲप तुम्हाला तुमच्या रेशन कार्डच स्टेटस तपासण्याची, धान्याची माहिती पाहण्याची, आणि केवायसी व्हेरिफिकेशन चेक करण्याची सुविधा देते.

तर मेरा ई-केवायसी ॲप विशेषतः रेशन कार्डच्या केवायसीसाठी बनवल आहे. या ॲपमध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करून ओळख पडताळणी करता येते. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण यामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी वापरला जातो. या ॲप्समुळे रेशन दुकानात जाऊन रांगेत उभ राहण्याची गरज नाही, आणि तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकता.

Ration Card eKyc करण्याची सोपी प्रक्रिया

रेशन कार्डची केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्सची गरज आहे – Mera eKYC आणि AadhaarFaceRD. ही दोन्ही ॲप्स भारत सरकारची अधिकृत ॲप्स आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांचा वापर पूर्णपणे सुरक्षितपणे करू शकता.

चला, आता ही प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजून घेऊया. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जा आणि ‘AadhaarFaceRD’ हे ॲप शोधून डाऊनलोड करा. हे ॲप तुम्हाला ओपन करण्याची गरज नाही, फक्त ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असण गरजेच आहे, कारण Mera eKYC ॲपला फेस स्कॅनसाठी या ॲपची गरज पडते.

आता दुसरं ॲप डाऊनलोड करा – ‘मेरा ई-केवायसी’. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करा. ॲप ओपन केल्यावर तुमच्याकडून काही परमिशन्स मागितल्या जातील, जस की Locationआणि Camera Access. या सर्व Permissions Allow करा, कारण हे ॲप भारत सरकारच आहे, आणि याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे.

आता ॲपमध्ये तुम्हाला तुमच राज्य निवडायच आहे. ‘Select State’ वर क्लिक करून महाराष्ट्र निवडा, आणि नंतर ‘Verify Location’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर ‘Generate OTP’ बटनावर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी ओटीपी येईल. हा ओटीपी ॲपमध्ये टाकून, खाली दिसणारा Captch Code टाका, आणि ‘Submit’ बटनावर क्लिक करा. जर सर्व माहिती बरोबर असेल, तर तुम्ही ॲपमध्ये Login होऊन जाल.

हे वाचल का ? -  Electric Car खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! TATA Curvv EV आणि TATA Nexon EV बॅटरीवर आयुष्यभराची वॉरंटी

लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये ‘eKyc Status’ हा पर्याय दिसेल. जर तुमची केवायसी आधीच झालेली असेल, तर या पर्यायासमोर ‘Y’ (YES) अस लिहिलेल दिसेल. पण जर तुमची KYC बाकी असेल, तर हा पर्याय रिकामा दिसेल. अशा परिस्थितीत तुम्हाला केवायसी करावी लागेल. केवायसी करण्यासाठी खाली ‘Face eKyc’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ‘Accept’ बटनावर क्लिक करा.

आता ॲप तुमचा Camera ओपन करेल, आणि तुम्हाला तुमचा चेहरा Scan करायचा आहे. Face Scan करताना तुम्हाला तुमच्या पापण्या हलवाव्या लागतील, म्हणजे डोळे उघडा-बंद करा. कॅमेऱ्यासमोर चांगल्या प्रकाशात राहा, जेणेकरून तुमचा चेहरा स्पष्टपणे स्कॅन होईल. स्कॅनिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कॅमेऱ्याभोवती असलेली रिंग हिरव्या रंगाची होईल, आणि तुम्हाला ‘eKyc Register Succefull’ असा मेसेज मिळेल. याचा अर्थ तुमची केवायसी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

मेरा रेशन ॲपमध्ये केवायसी स्टेटस कस तपासायचं?

आता तुमची केवायसी यशस्वीपणे झाली आहे, पण ती मेरा रेशन ॲपमध्ये व्हेरिफाय झाली आहे की नाही, हे कसं तपासायचं? यासाठी तुम्हाला Mera Ration ॲप डाऊनलोड कराव लागेल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करा, आणि त्यात लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकावा लागेल.

लॉगिन झाल्यावर तुम्हाला ‘Aadhar Seeding’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नाव दिसतील, आणि त्यांच्या नावासमोर ‘YES’ किंवा ‘NO’ अस लिहिलेल दिसेल. ज्या सदस्याच्या नावासमोर ‘YES’ असेल, त्यांची KYC झालेली आहे, आणि जिथे ‘NO’ असेल, तिथे KYC बाकी आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही Mera eKYC ॲपमधून केवायसी केली असेल, तर ती मेरा रेशन ॲपमध्ये अपडेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. काहीवेळा याला 2-3 महिने लागतात, कारण ही सरकारी प्रक्रिया आहे, आणि सर्व माहिती सिस्टममध्ये अपडेट होण्यासाठी वेळ लागतो.

Ration Card eKyc न केल्यास काय होईल?

जर तुम्ही तुम्ही Ration Card eKyc वेळेवर पूर्ण केली नाही, तर तुमच रेशन कार्ड रद्द होऊ शकत. याचा अर्थ तुम्हाला स्वस्त दरात धान्य मिळण बंद होईल. विशेषतः अनेक कुटुंबांसाठी रेशन कार्ड हा आर्थिक आधार आहे, आणि त्यामुळे ही प्रक्रिया वेळेवर करण खूप महत्त्वाच आहे. शासनाने स्पष्ट केल आहे की, ज्या रेशन कार्डधारकांनी KYC केली नाही, त्यांची नावे यादीतून काढून टाकली जातील. याशिवाय, केवायसी न केल्यामुळे तुम्हाला इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यातही अडचण येऊ शकते, कारण रेशन कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही वापरल जात. म्हणूनच, वेळेवर केवायसी करून घ्या, आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.

हे वाचल का ? -  संजय गांधी निराधार योजनेत 6000 पेन्शन वाढ ?

Ration Card eKyc चे फायदे

Ration Card eKyc करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. दुसर म्हणजे, मेरा ई-केवायसी ॲपमुळे तुम्हाला रेशन दुकानात जाऊन रांगेत उभ राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

तिसर, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच रेशन कार्ड सुरक्षित राहत, आणि तुम्हाला धान्य मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. याशिवाय, केवायसीमुळे रेशन कार्डशी संबंधित चुकीची माहिती किंवा बनावट कार्ड्स काढून टाकली जातात, ज्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचतं. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे, आणि तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचं स्टेटस कधीही तपासता येत.

फसवणुकीपासून सावध राहा

Ration Card eKyc च्या नावाखाली काही ठिकाणी फसवणूक होत असल्याचही समोर आल आहे. काही लोक पैशांची मागणी करतात, किंवा बनावट ॲप्सद्वारे तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, केवायसी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. फक्त भारत सरकारची अधिकृत ॲप्सच वापरा, जस की मेरा ई-केवायसी आणि आधार फेस आरडी सेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमचा आधार क्रमांक किंवा ओटीपी देऊ नका.

तसेच, KYC साठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल, तर तातडीने सायबर क्राइम विभागात तक्रार नोंदवा. सावध राहा, आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.

माझा अनुभव: मी स्वतःची केवायसी कशी केली?

मी स्वतः मेरा ई-केवायसी ॲपद्वारे माझ्या रेशन कार्डची केवायसी केली आहे, आणि ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. मी Mera e-KYC Application डाऊनलोड केल, आणि माझा आधार क्रमांक टाकून OTP द्वारे Login केल. त्यानंतर मी फेस ई-केवायसी पर्याय निवडला, आणि माझा चेहरा स्कॅन केला. काही सेकंदातच मला ‘e-KYC’ रजिस्टर सक्सेसफुल’ असा मेसेज मिळाला.

नंतर मी मेरा रेशन ॲपमध्ये माझ्या रेशन कार्डच स्टेटस तपासल, आणि काही दिवसांनी माझी केवायसी व्हेरिफाय झाल्याच दिसल. मला या प्रक्रियेसाठी रेशन दुकानात जाव लागल नाही, किंवा कोणालाही पैसे द्यावे लागले नाहीत. ही प्रक्रिया इतकी सोपी होती की, मला विश्वासच बसला नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, की तुम्हीही ही प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या, आणि तुमचं रेशन कार्ड सुरक्षित ठेवा.

Ration Card Kyc ही एक अशी प्रक्रिया आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देते. मेरा रेशन आणि मेरा ई-केवायसी या ॲप्समुळे ही प्रक्रिया आता खूपच सोपी आणि सुलभ झाली आहे. तुम्हाला फक्त काही मिनिट द्यावी लागतील, आणि तुमचं रेशन कार्ड सुरक्षित होईल. पण ही प्रक्रिया वेळेवर करण खूप महत्त्वाच आहे, कारण जर तुम्ही वेळेवर केवायसी केली नाही, तर तुमच रेशन कार्ड बंद होऊ शकत.आणि तुम्हाला धान्य मिळणं बंद होईल. म्हणूनच, आजच तुमच्या मोबाईलमधून मेरा ई-केवायसी ॲप डाऊनलोड करा, आणि तुमची केवायसी पूर्ण करा. ही माहिती तुमच्या ओळखीच्या लोकांनाही शेअर करा, जेणेकरून तेही वेळेवर केवायसी करून त्यांच रेशन कार्ड सुरक्षित ठेवतील.

हे वाचल का ? -  क्वांटम कम्प्युटिंगमध्ये क्रांती: एनव्हिडियाचे सीईओ म्हणतात, ‘हा आहे टर्निंग पॉइंट’ (Quantum Computing Inflection Point 2025)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Ration Card eKyc म्हणजे काय?

Ration Card eKyc म्हणजे तुमच्या रेशन कार्डशी जोडलेली माहिती, जसं की तुमचं नाव, पत्ता, आणि आधार कार्ड, खरी आहे की नाही हे तपासण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया आधार कार्ड आणि फेस स्कॅनद्वारे केली जाते, ज्यामुळे रेशन कार्ड बनावट नाही आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतंय, याची खात्री केली जाते.

रेशन कार्डची केवायसी करणं का गरजेचं आहे?

रेशन कार्डची केवायसी करणं गरजेचं आहे कारण शासनाला हे खात्री करायची आहे की, रेशन कार्डचा वापर फक्त खऱ्या गरजू व्यक्तीच करत आहेत. जर तुम्ही केवायसी केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं, आणि तुम्हाला स्वस्त दरात धान्य मिळणं बंद होईल. याशिवाय, केवायसीमुळे बनावट रेशन कार्ड्स काढून टाकली जातात, ज्यामुळे खऱ्या गरजूंना फायदा होतो.

केवायसी पूर्ण झाल्यावर मेरा रेशन ॲपमध्ये स्टेटस कसं तपासायचं?

केवायसी पूर्ण झाल्यावर मेरा रेशन ॲप डाऊनलोड करा आणि लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा आधार क्रमांक टाका. त्यानंतर ‘आधार सिडिंग’ पर्यायावर क्लिक करा. येथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावं दिसतील. ज्या सदस्याच्या नावासमोर ‘YES’ असेल, त्यांची केवायसी व्हेरिफाय झालेली आहे. जर ‘NO’ दिसत असेल, तर केवायसी बाकी आहे.

मेरा रेशन ॲपमध्ये Ration Card eKyc स्टेटस अपडेट होण्यासाठी किती वेळ लागतो?

मेरा ई-केवायसी ॲपमधून Ration Card eKyc पूर्ण केल्यानंतर ती मेरा रेशन ॲपमध्ये अपडेट होण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 महिने लागू शकतात. ही एक सरकारी प्रक्रिया आहे, आणि सर्व माहिती सिस्टममध्ये अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही केवायसी केल्यानंतर थोडं संयम ठेवा, आणि काही दिवसांनी मेरा रेशन ॲपमध्ये स्टेटस तपासा.

Ration Card eKyc करण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

नाही, Ration Card eKyc पूर्णपणे मोफत आहे. मेरा ई-केवायसी आणि मेरा रेशन ॲपद्वारे ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. जर कोणी तुमच्याकडून पैसे मागत असेल, तर सावध राहा आणि तातडीने तक्रार नोंदवा, कारण ही प्रक्रिया शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment