घरकुल योजना 2025: या योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

घरकुल योजना 2025: या योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, “स्वतःच पक्कं घर असाव” अस स्वप्न प्रत्येकाच असत. पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे, जी तुम्हाला स्वतःच घर मिळवण्यात मदत करेल. ही योजना म्हणजे घरकुल योजना, ज्याला पीएम आवास योजना (PMAY) असंही म्हणतात.

WhatsApp Group Join Now

2025 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे, आणि ती इतकी सोपी आहे की कोणीही ती करू शकत.आज आपण या योजनेचा अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागतील, आणि कोण पात्र आहे, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

घरकुल योजना 2025: काय आहे ही योजना?

घरकुल योजना, ज्याला पंतप्रधान आवास योजना (PMAY) असही म्हणतात, ही भारत सरकारची एक महत्त्वाकाक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की ज्यांच्याकडे पक्क घर नाही, अशा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःच घर मिळवून देण ! ही योजना 2015 मध्ये सुरू झाली आणि 2025 मध्येही ती सुरू आहे.

या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला आर्थिक मदत करते, ज्यामुळे तुम्ही तुमच घर बांधू शकता किंवा खरेदी करू शकता. विशेष म्हणजे आता ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. तुम्हाला फक्त तुमचा मोबाइल फोन आणि इंटरनेटची गरज आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोकांनाही या योजनेचा लाभ घेण सोप झाल आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

ही योजना खासकरून त्या कुटुंबांसाठी आहे ज्यांच्याकडे पक्क घर नाही. याशिवाय, ज्यांच वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो. पण काही अटी आहेत, ज्या आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन

घरकुल योजनेचा अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही सोप्या पायऱ्या फॉलो करायच्या आहेत.

स्टेप 1 – मोबाइल अ‍ॅप्स डाउनलोड करा

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये दोन अ‍ॅप्स डाउनलोड करायची आहेत. पहिलं अ‍ॅप आहे “आधार फेस आरडी” आणि दुसरं अ‍ॅप आहे “आवास प्लस”. हे दोन्ही अ‍ॅप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळतील. ही अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर ती इन्स्टॉल करा.

हे वाचल का ? -  3,000 रुपयांत 200 प्रवास! Fastag Annual Pass बद्दल नितीन गडकरींची मोठी घोषणा !

AadhaarFaceRD अ‍ॅप घेण्यासाठी डाउनलोड बटन वर क्लिक करा – Download

AwaasPlus अ‍ॅप घेण्यासाठी डाउनलोड बटन वर क्लिक करा – Download

आवास प्लस अ‍ॅप उघडल्यानंतर तुम्हाला एक ओपनचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. मग तुम्हाला कोणती भाषा हवी आहे, ती निवडा. तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणतीही भाषा निवडू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा.

स्टेप 2 – परवानग्या द्या आणि सेल्फ सर्वे सुरू करा

अ‍ॅप उघडल्यानंतर तुमच्या मोबाइलला काही परवानग्या मागितल्या जातील, जस की कॅमेरा आणि लोकेशनच्या परवानग्या. या परवानग्या द्या, कारण त्या अर्ज प्रक्रियेसाठी गरजेच्या आहेत.

परवानग्या दिल्यानंतर तुम्हाला “सेल्फ सर्वे” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. मग तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली “ऑथेंटिकेट” बटणावर क्लिक करा.

स्टेप 3 – चेहरा स्कॅन करा

आता तुमच्या मोबाइलचा कॅमेरा उघडेल आणि तुम्हाला ज्यांच्या नावाने अर्ज भरायचा आहे, त्यांचा चेहरा स्कॅन करायचा आहे. जोपर्यंत फोटो कॅप्चर होत नाही, तोपर्यंत डोळे उघड-झाक करत राहा. एकदा फोटो कॅप्चर झाला की, आधारवरील माहिती तपासा आणि “ओके” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4- पिन तयार करा

आता तुम्हाला एक चार अंकी पिन तयार करायचा आहे. हा पिन तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. पिन टाकल्यानंतर “कन्फर्म पिन” पर्यायात तोच पिन पुन्हा टाका. दोन्ही पिन एकसारखे असतील तरच पुढे जाता येईल. मग “क्रिएट पिन” बटणावर क्लिक करा. पिन तयार केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं स्थान निवडायचं आहे.

स्टेप 5- स्थान निवडा

तुम्हाला तुमच राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायच आहे. उदा., जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल, तर राज्य म्हणून महाराष्ट्र निवडा. मग तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती टाका. ही माहिती काळजीपूर्वक निवडा, कारण यावरच तुमच्या अर्जाची पडताळणी अवलंबून आहे. सर्व माहिती निवडल्यानंतर खाली “प्रोसीड” बटणावर क्लिक करा.

स्टेप 6 – वैयक्तिक माहिती भरा

आता तुम्हाला चार पर्याय दिसतील. यापैकी “ऍड” किंवा “एडिट” हा पर्याय निवडा. जर तुम्ही नवीन अर्ज भरत असाल, तर “ऍड” पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ज्यांच्या नावाने अर्ज भरायचा आहे, त्यांच नाव टाका. मग आधार क्रमांक, जॉब कार्ड क्रमांक (जर असेल तर), लिंग, वय, आणि विवाहित आहे की नाही, ही माहिती टाका. याशिवाय, तुम्हाला तुमच शिक्षण, व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती सुद्धा टाकायची आहे.

हे वाचल का ? -  गोंदियात धक्कादायक घटना अल्पवयीन मुलाने स्वतःच्या आईलाच संपवल ! कारण ऐकून बसेल धक्का !

उदा., तुम्ही शेतकरी आहात की मजूर, आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, ही माहिती भरा. जर कोणाला अपंगत्व असेल, तर ती माहितीही टाका. सर्व माहिती टाकल्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न टाका आणि “सेव्ह अँड नेक्स्ट” बटणावर क्लिक करा.

स्टेप 7- कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा

तुमच्या रेशन कार्डवर जेवढे सदस्य आहेत, त्या सर्वांची माहिती टाका. उदा., त्यांच नाव, वय, लिंग आणि ते काय करतात, ही माहिती भरा. ही माहिती टाकल्यानंतर “नेक्स्ट” बटणावर क्लिक करत राहा. सर्व माहिती टाकल्यानंतर “सेव्ह अँड नेक्स्ट” बटणावर क्लिक करा.

स्टेप 8- बँकेची माहिती

आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती टाकायची आहे. तुमची बँक कोणती आहे, ती निवडा. मग तुमचा IFSC कोड आणि खाते क्रमांक टाका. खाते क्रमांक दोनदा टाकून कन्फर्म करा, जेणेकरून चूक होणार नाही. लक्षात ठेवा, हा खाते क्रमांक ज्यांच्या नावाने अर्ज भरत आहात, त्यांचाच असायला पाहिजे. सर्व माहिती टाकल्यानंतर “नेक्स्ट” बटणावर क्लिक करा.

स्टेप 9- घर आणि जागेची माहिती

आता तुम्हाला तुमच्या सध्याच्या घराची आणि नवीन घरासाठी जागेची माहिती टाकायची आहे. तुमच सध्याच घर कच्च आहे की पक्क, याची माहिती टाका. उदा., तुमच घर तुमच्या नावावर आहे का, की भाड्याच आहे? घराच्या भिंती कशा आहेत, किती खोल्या आहेत, आणि संडास-बाथरूमची सोय आहे का, हे सर्व टाका.

जर तुमच्या घरात या सुविधा नसतील, तर “नाही” पर्याय निवडा. जर असतील, तर “हो” निवडा. ही माहिती टाकताना खरी माहिती टाका, कारण यावरच तुमची पात्रता ठरते.

स्टेप 10 – नवीन जागेची माहिती

आता जिथे तुम्हाला नवीन घर बांधायच आहे, त्या जागेचा फोटो अपलोड करा. हा फोटो काढताना जागा स्पष्ट दिसेल, याची काळजी घ्या. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही तिथे काही माहिती लिहू शकता, जसं की “ही आमची नवीन जागा आहे, इथे आम्हाला घर बांधायच आहे.” मग “नेक्स्ट” बटणावर क्लिक करा.

स्टेप 11- घराच मॉडेल निवडा

आता तुम्हाला कोणत्या प्रकारच घर बांधायच आहे, ते मॉडेल निवडायच आहे. अ‍ॅपमध्ये काही मॉडेल्स दिलेली असतील, त्यापैकी तुम्हाला हव ते निवडा. याशिवाय, तुम्हाला प्रशिक्षण हव आहे का, हा पर्यायही निवडायचा आहे. प्रशिक्षणासाठी “हो” पर्याय निवडण चांगलंआहे.

हे वाचल का ? -  AC वापरणाऱ्यांनो सावधान! 20 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली एसी वापरता येणार नाही ! भारत सरकारचे नवीन नियम?

घरकुल योजना : पात्रतेच्या अटी आणि अपात्रता

घरकुल योजनेसाठी कोण अपात्र आहे?

या योजनेअंतर्गत काही कुटुंबे अपात्र ठरतात. उदा., जर तुमच्याकडे चारचाकी किंवा तीनचाकी वाहन असेल, किंवा तुमच वार्षिक उत्पन्न जास्त असेल, तर तुम्ही अपात्र ठरता. याशिवाय, जर तुमच्याकडे 50,000 पेक्षा जास्त कर्ज असेल, किंवा तुम्ही आयकर भरत असाल, तरीही तुम्ही अपात्र आहात. जर तुमच्या कुटुंबातील कोणता सदस्य सरकारी नोकरीत असेल, किंवा तुमच्याकडे अडीच एकरपेक्षा जास्त बागायती जमीन असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

पात्रतेसाठी काय करावं?

जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल, तर सर्व पर्यायांमध्ये “नो” निवडा. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल, तर “हो” पर्याय निवडा. सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि “प्रोसीड” बटणावर क्लिक करा.

अर्ज तपासा आणि सबमिट करा

सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करायची वेळ आहे. सर्व माहिती एकदा नीट तपासा. जर सर्व काही बरोबर असेल, तर “प्रोसीड” बटणावर क्लिक करा. मग तुम्हाला “सक्सेस” असा संदेश मिळेल, म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे.

आता “अपलोड अँड सर्वे” पर्यायावर जा. मग “व्हेरिफाय आधार” आणि “अपलोड रेकॉर्ड” बटणावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट होईल.

घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पर्याय

जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामसेवकाकडे जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता. त्यांच्याकडे सर्व माहिती देऊन तुम्ही अर्ज भरू शकता.

योजनेचा लाभ आणि भविष्य

घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यानंतर तुम्हाला स्वतःच पक्क घर मिळेल. ही योजना अनेक कुटुंबांच स्वप्न पूर्ण करत आहे. पण अर्ज करताना खरी माहिती देण खूप महत्त्वाच आहे, कारण चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल, पण ती मेहनत तुम्हाला तुमच स्वप्न पूर्ण करून देईल.

हे वाचल का ?तुमच्या नावावर किती सिम कार्डस् आहेत तपासल का?

घरकुल योजना 2025 ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता आणि स्वतःच पक्क घर मिळवू शकता. या लेखात दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज सहज भरू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली, तर तुमच्या गावच्या ग्रामसेवकाची मदत घ्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment