छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील बजाज नगरात 15 मे 2025 च्या पहाटे एक मोठा दरोडा पडला. या दरोड्यात चोरांनी तब्बल 6 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला. एकूण 37 किलो सोने आणि चांदी लुटून चोरांनी संपूर्ण परिसरात खळबळ माजवली आहे. ज्या घरात ही चोरी झाली, त्या घराचे मालक संतोष लड्डा हे सध्या अमेरिकेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत चोरांनी घराची पूर्ण उलथापालथ करत हा दरोडा घातला. या चोरीची बातमी समजताच स्थानिक लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरल. छत्रपती संभाजीनगरमधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दरोडा असल्याच बोलल जात आहे. याबाबत आपण या चोरीची संपूर्ण कहाणी, पोलिसांचा तपास आणि या प्रकरणामागच रहस्य जाणून घेणार आहोत.
बजाज नगरातील चोरी- नेमक काय घडल त्या रात्री?
15 मे 2025 च्या पहाटे साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरातील एका घराच दार वाजल. दार उघडताच शेजाऱ्यांना एक धक्कादायक दृश्य दिसल. संजय झळके नावाचा एक माणूस हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत दारात उभा होता. त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली होती, आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. शेजाऱ्यांनी लगेच त्याची मदत केली आणि पोलिसांना बोलावल.
संजय झळके हे संतोष लड्डा यांचे ड्रायव्हर आणि घराचे काळजीवाहू होते. मागच्या 19 वर्षांपासून ते लड्डा कुटुंबासोबत काम करत होते. जेव्हा लड्डा कुटुंब बाहेरगावी जात, तेव्हा घराची जबाबदारी झळके यांच्यावर सोपवली जाते. झळके यांनी शेजाऱ्यांना सांगितल की, 14 मे च्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी घराच मुख्य दार आणि कंपाउंडच गेट नीट बंद केल होत.
पण मध्यरात्री 2 वाजता अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे हात पाठीमागे बांधले, तोंडाला चिकटपट्टी लावली, आणि छातीवर बंदूक ठेवून त्यांना धमकावल. झळके सांगतात, “मला वाटल की मी स्वप्न पाहतोय, पण जेव्हा मला हॉलमधल्या फरशीवर पडलेल पाहिल, तेव्हा माझ्या लक्षात आल की घरावर दरोडा पडला आहे.” दोन तास चोरांनी घरात धुमाकूळ घातला, आणि पहाटे 4 वाजता ते पळून गेले.
तब्बल 37 किलो सोने-चांदीची लूट
या दरोड्यात चोरांनी एकूण 37 किलो सोने आणि चांदी लुटली. यामध्ये साडेपाच किलो सोन्याचे दागिने होते, ज्यात पाटल्या, मंगळसूत्र, सोन्याची बिस्किटे, बांगड्या, कानातले, झुंबर, फुल आणि अंगठ्या यांचा समावेश होता. याशिवाय चोरांनी हिऱ्याचे दागिने, 32 किलो चांदी आणि 70 हजारांची रोकडही लुटली. चांदीच्या वस्तूंमध्ये देवाच्या मूर्ती, ताट, वाट्या, पैंजण, पेले, चमचे आणि नाणी यांचा समावेश होता. या सर्व मालाची किंमत जवळपास 6 कोटी रुपये आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे.पण चोरांच्या हाती लागलेला माल यापेक्षा जास्त किंमतीचा होता.
लड्डा यांचे मेवणे जगदीश तोषणेवाल यांनी सांगितल की, घरात एकूण 8 किलो सोने आणि 32 किलो चांदी होती. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा त्यांना अजून अडीच किलो सोने सापडल, जे चोरांना लुटता आल नाही. याचा अर्थ, चोरांनी 6 कोटींचा माल लुटला, पण एकूण मालाची किंमत 10 कोटींच्या आसपास आहे.
लड्डा कुटुंब आणि त्यांच घर – कोण आहेत संतोष लड्डा?
ज्या घरात हा दरोडा पडला, ते घर संतोष लड्डा यांच आहे. संतोष लड्डा हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे आहेत. 2004 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगरजवळच्या वाळूज एमआयडीसीमध्ये ‘दिशा ऑटो कॉम्पोनंट्स’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत ऑइल आणि गॅस पाइपलाइनसाठीचे पार्ट्स बनवले जातात, आणि त्यांची निर्यात केली जाते. लड्डा यांच्या पत्नीच्या माहेरच्या नातेवाइकांचीही या कंपनीत भागीदारी आहे.
लड्डा कुटुंब बजाज नगरातील आरएल 93 सेक्टरमध्ये राहत. त्यांच घर जवळपास 2000 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल आहे, ज्यामध्ये चार खोल्या आणि एक मोठा हॉल आहे. घराच्या चारही बाजूंनी कंपाउंड आहे. तीन महिन्यांपूर्वीच लड्डा यांनी घराच नूतनीकरण केल होत, कारण त्यांच्या मुलाच लवकरच लग्न होणार आहे.
पण या चोरीच्या वेळी लड्डा कुटुंब घरात नव्हत. 7 मे 2025 रोजी संतोष लड्डा त्यांच्या कुटुंबासह अमेरिकेला गेले होते. त्यांचा मुलगा क्षितीज अमेरिकेत एमएस करतोय, आणि त्याच्या पदवीदान समारंभासाठी कुटुंब अमेरिकेत गेल होत. त्यानंतर ते काही दिवस अमेरिकेत फिरणार होते, आणि 24 मे रोजी भारतात परतणार होते. लड्डा कुटुंब अमेरिकेत असताना घराची जबाबदारी संजय झळके यांच्यावर सोपवण्यात आली होती.
चोरांनी घरात प्रवेश कसा केला?
चोरांनी लड्डा यांच्या घरात कसा प्रवेश केला, याचा तपशील पोलिसांना शेजारच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला. 15 मे च्या मध्यरात्री 1 वाजून 53 मिनिटांनी लड्डा यांच्या घरापलीकडील रस्त्यावर एक पांढरी स्विफ्ट डिझायर कार थांबली. या कारला नंबर प्लेट नव्हती. कारमधून सहा जण उतरले, आणि त्यांनी आपले चेहरे कापडाने झाकले होते.
हे सहा जण लड्डा यांच्या घरासमोर आले, आणि सुमारे सहा फूट उंचीच्या कंपाउंडवरून आत उड्या मारल्या. दोन जण कंपाउंडच्या आत लक्ष ठेवण्यासाठी थांबले, तर बाकीचे चार जण घराच्या डाव्या बाजूने गेले. तिथे एक शिडी होती, जी तीन महिन्यांपूर्वी घराच्या नूतनीकरणाच्या वेळी तिथेच राहिली होती. या शिडीचा वापर करून चोर टेरेसवर चढले, आणि टेरेसचा दरवाजा तोडून घरात शिरले.
घरात शिरल्यानंतर त्यांनी हॉलमध्ये झोपलेल्या संजय झळके यांच्यावर हल्ला केला. त्यांचे हात बांधले, तोंडाला चिकटपट्टी लावली, आणि छातीवर बंदूक ठेवून धमकावल. झळके पळून जाऊ नयेत म्हणून दोन चोर त्यांच्याजवळ थांबले, तर बाकीचे दोन चोर घरात लुटालूट करायला गेले.
लुटालुटीची रात्र -चोरांनी काय लुटल?
चोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सगळ्या खोल्यांची उलथापालथ केली. लड्डा यांनी खोल्या लॉक केल्या होत्या, पण चोरांनी ग्रॅनाइटच्या चौकटी उखडून या खोल्या उघडल्या. त्यांनी बेड, कपाट आणि देवघरातील ड्रॉवर उघडले. यातून त्यांनी साडेपाच किलो सोन्याचे दागिने लुटले, ज्यात पाटल्या, मंगळसूत्र, बांगड्या, आणि हिऱ्याचे दागिने होते.
याशिवाय 32 किलो चांदीच्या वस्तू, ज्यात देवाच्या मूर्ती, ताट, वाट्या आणि पेले होते, त्या लुटल्या. चोरांना घरात 70 हजारांची रोकडही मिळाली. जवळपास दोन तास चोरांनी घराची लूटमार केली. पहाटे 4 वाजता त्यांनी सगळ लुटून पळ काढला.
चोरांनी झळके यांचा मोबाइलही घेतला, जेणेकरून ते कोणाला कॉल करू शकणार नाहीत. सीसीटीव्ही फुटेजनुसार, पहाटे 4 वाजून 2 मिनिटांनी चोर त्यांच्या कारजवळ आले आणि तिथून पळून गेले. चोर गेल्याची खात्री झाल्यावर झळके यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांचा तपास – काय सापडल?
चोरीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा सुरू केला आणि चोरांचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं पाठवली. पोलिसांनी आसपासचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. 15 मे रोजी त्यांनी 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, आणि 16 मे पर्यंत हा आकडा 200 च्या पुढे गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांची कार लुधियाना मार्गावर जाताना दिसली, पण त्यानंतर वाळूज टोल नाक्यावर ती दिसली नाही.
पोलिसांना संशय आहे की, चोरांनी मधल्या रस्त्याने पळ काढला किंवा गाडी बदलून पसार झाले. पोलिसांनी झळके यांचा मोबाइल ट्रॅक केला, आणि तो कामगार चौकाजवळ फेकलेला सापडला. चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक बोलावण्यात आल, पण त्यांनाही कोणताच माग लागला नाही. पोलिसांचा अंदाज आहे की, चोरांनी घराची आणि परिसराची चांगली रेकी केली होती.
चोरांना घरात कुठे काय आहे, कोणत्या खोलीत सोने आहे, आणि कोणते ड्रॉवर उघडायचे, हे सगळ माहीत होत. काही खोल्यांमध्ये त्यांनी उलथापालथ केलीच नाही, ज्यामुळे पोलिसांना संशय आहे की, ही माहिती त्यांना घरातीलच कोणीतरी दिली असावी.
संशय आणि चौकशी – कोण आहे संशयाच्या भोवऱ्यात?
पोलिसांनी या प्रकरणात संजय झळके यांची कसून चौकशी केली. झळके यांनी सांगितल की, चोर एकमेकांशी हिंदीत बोलत होते, आणि ते एकमेकांना सलमान आणि गुड्डू अशा नावांनी हाक मारत होते. पण पोलिसांना वाटत की, चोरांनी मुद्दाम खोटी नाव वापरली असावीत, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल.
लड्डा यांचे मेवणे जगदीश तोषणेवाल यांनी सांगितल की, घरात 8 किलो सोने आणि 32 किलो चांदी होती, कारण त्यांच्या भाचीच लग्न होत. लड्डा यांना अमेरिकेला जाव लागल, त्यामुळे हे दागिने बँकेत ठेवता आले नाहीत. पोलिसांनी संजय झळके यांची तीन वेळा चौकशी केली, आणि त्यांच्या मुलाचाही जबाब घेतला.
लड्डा यांच्या कंपनीतील 25 ते 30 कामगारांची चौकशी झाली. कंपनीतील ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड यांचीही वेगळी चौकशी सुरू आहे, कारण ते अनेकदा लड्डा यांच्या घरी येत-जात होते. पोलिसांना संशय आहे की, या दरोड्यासाठी जवळच्याच कोणीतरी टिप दिली असावी. त्यामुळे संशयितांच्या मागील 10 दिवसांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
या चोरीमागच रहस्य काय?
या चोरीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तर अजूनही मिळाली नाहीत. पहिला प्रश्न, चोरांनी झळके यांचे हात बांधले, पण त्यांना घरात बांधून का ठेवल नाही? दुसरा प्रश्न, चोरांना सोने कोणत्या खोलीत आणि कोणत्या ड्रॉवरमध्ये आहे, हे कस माहीत होत? तिसरा प्रश्न, लड्डा हे मोठे उद्योगपती होते, आणि त्यांच्या घरात इतक सोने होत, मग घरात सिक्युरिटी गार्ड किंवा सीसीटीव्ही का नव्हते?
चौथा प्रश्न, घरात इतक सोने का ठेवण्यात आल होत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या चोरीच गूढ कधी आणि कस उलगडणार? माझ्या एका मित्राने सांगितल की, अशा चोऱ्यांमध्ये अनेकदा जवळच्याच लोकांचा हात असतो, आणि पोलिसांना ते शोधून काढण खूप कठीण जात. पोलिसांचा तपास सुरू आहे, आणि 10 पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण आज, 18 मे 2025 पर्यंत चोरांचा कोणताही माग लागलेला नाही.
पोलिसांचा तपास आणि भविष्यातील शक्यता
छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरात घडलेला हा 6 कोटींचा दरोडा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे. चोरांनी 37 किलो सोने आणि चांदी लुटून एक मोठी चोरी केली, आणि स्थानिक लोकांमध्ये भीतीच वातावरण पसरल आहे. पोलिसांचा तपास सध्या पूर्ण वेगात सुरू आहे, आणि ते चोरांचा माग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण या चोरीमागच रहस्य अजूनही कायम आहे. चोरांना कोणी टिप दिली? ते कसे पळाले? आणि हे प्रकरण कधी उघडकीस येणार? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.