अमेरिकन मॅगझिन स्क्वायरने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावे आहेत, पण त्यापैकी काही खास नावांनी सगळ्यांचं लक्ष वेधल आहे. यात आपला लाडका अभिनेता शाहरुख खान आहे, जो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे आणि टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता आहे.
या अभिनेत्यांनी फक्त अभिनयातूनच नाही, तर सिनेमाबाहेरील व्यवसायातूनही प्रचंड संपत्ती कमावली आहे. मग ते रियल इस्टेट असो, प्रोडक्शन हाऊस असो किंवा इतर व्यावसायिक उपक्रम, या सगळ्यांनी त्यांना जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत आणलं आहे. आपण या अभिनेत्यांच्या संपत्तीचा आणि त्यांच्या यशाचा प्रवास सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
पहिला क्रमांक – आर्नोल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger)

आर्नोल्ड श्वार्झनेगर हे नाव ऐकल की त्यांचे हॉलीवूड चित्रपट आणि त्यांचा बॉडी बिल्डिंगचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो. आर्नोल्ड हे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सात वेळा मिस्टर ओलंपिया हा बॉडी बिल्डिंगमधील सर्वात मोठा पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय ते पाच वेळा मिस्टर युनिव्हर्स आणि एकदा मिस्टर वर्ल्डही झाले आहेत.
आर्नोल्ड यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बॉडी बिल्डिंगपासून केली, पण नंतर ते हॉलीवूडमध्ये आले आणि त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. टर्मिनेटर सारख्या चित्रपटांनी त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. पण त्यांची संपत्ती फक्त अभिनयातून नाही, तर त्यांनी केलेल्या रियल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळे वाढली. फोर्ब्स मॅगझिनने त्यांच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये अस लिहिल होत की, रियल इस्टेटमधील चांगल्या गुंतवणुकीमुळे आर्नोल्ड बिलियन डॉलरच्या यादीत पोहोचले आहेत.
हे वाचल का ? – हेलिकॉप्टर शॉटचा शोध धोनीने नाही लावला ! तर मग कोणी लावला ?
आज आर्नोल्ड जगातील एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये 5% भागधारक आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती, आणि आज त्यांच्या या गुंतवणुकीमुळे त्यांची संपत्ती 1.49 बिलियन डॉलर (सुमारे 12,500 कोटी रुपये) इतकी आहे.
दुसरा क्रमांक – ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) (The Rock)

Dwayne Johnson ज्यांना आपण “The Rock” म्हणून ओळखतो, ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ड्वेन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात WWE (रेसलिंग) मधून केली. पण 2024 पर्यंत त्यांची ओळख एका रेसलरपेक्षा जास्त एक अभिनेता म्हणून झाली. त्यांनी “फास्ट अँड फ्युरियस” आणि “जुमांजी” सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल आहे.
ड्वेन यांची पहिलीच हॉलीवूड फिल्म “द मम्मी रिटर्न्स” होती, आणि या चित्रपटासाठी त्यांना मिळालेली फी इतकी जास्त होती की त्यांच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवल गेल. आज ड्वेन हॉलीवूडमधील सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण त्यांची संपत्ती फक्त अभिनयातून नाही, तर त्यांच्या व्यवसायातूनही वाढली आहे.
ड्वेन यांच्याकडे टेरेमाना टकीला ब्रँडची 30% मालकी आहे, आणि या ब्रँडची किंमत आज 1 बिलियन डॉलर (सुमारे 8,400 कोटी रुपये) इतकी आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 1.19 बिलियन डॉलर (सुमारे 10,000 कोटी रुपये) इतकी झाली आहे. ड्वेन यांनी अभिनय आणि व्यवसाय यांचा मेळ घालून स्वतःला श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
तिसरा क्रमांक – टॉम क्रूझ (Tom Cruise)

Tom Cruise हे हॉलीवूडमधील एक आघाडीच नाव आहे. त्यांनी “मिशन इम्पॉसिबल” आणि “टॉप गन” सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून जगभरात प्रसिद्धी मिळवली. टॉम यांनी तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आहे आणि चार वेळा अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाल आहे.
टॉम यांची जास्तीत जास्त कमाई अभिनयातूनच होते. 2020 मध्ये एका विश्लेषणानुसार, त्यांनी चित्रपटातील प्रत्येक संवादाच्या शब्दामागे 7,000 डॉलर (सुमारे 8 लाख रुपये) कमाई केली आहे. पण त्यांनी रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे अमेरिकेच्या तटीय भागात आणि उत्तर अमेरिकेत अनेक मालमत्ता आहेत, ज्यामुळे त्यांची संपत्ती वाढली. आज टॉम क्रूझ यांची एकूण संपत्ती (Tom Cruise Net Worth) 891 मिलियन डॉलर (सुमारे 7,500 कोटी रुपये) इतकी आहे.
हे वाचल का ? – जगातील सर्वात महाग लाकुड आणि त्याची किंमत ?
चौथा क्रमांक – शाहरुख खान (Shah Rukh Khan)

आपला लाडका अभिनेता शाहरुख खान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, आणि तो टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता आहे. शाहरुखने गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपल स्थान कायम ठेवल आहे. 2023 मध्ये त्याच्या “पठान”, “जवान” आणि “डंकी” या तीन चित्रपटांनी जगभरातून 2,600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
पण शाहरुखची कमाई फक्त अभिनयापुरती मर्यादित नाही. त्यांच्याकडे रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन आणि VFX कंपनी आहे, जी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती करत आहे. याशिवाय शाहरुख आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमचे मालक आहेत. या दोन मोठ्या व्यवसायांबरोबरच त्यांनी इतर अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 876.5 मिलियन डॉलर (सुमारे 7,400 कोटी रुपये) इतकी झाली आहे.
पाचवा क्रमांक – जॉर्ज क्लूनी (George Clooney)

जॉर्ज क्लूनी हे हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी अभिनयातूनच नव्हे, तर व्यवसायातूनही प्रचंड संपत्ती कमावली आहे. जॉर्ज यांचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता तो त्यांच्या टकीला ब्रँड कासागोसचा. या ब्रँडचे ते सहसंस्थापक होते, आणि नंतर त्यांनी हा ब्रँड 1 बिलियन डॉलर (सुमारे 8,400 कोटी रुपये) मध्ये विकला.
सध्या जॉर्ज प्रोडक्शन क्षेत्रात काम करत आहेत, आणि त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. अभिनय आणि व्यवसाय यांच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत पाचव स्थान मिळवल आहे. त्यांची एकूण संपत्ती 743 मिलियन डॉलर (सुमारे 6,200 कोटी रुपये) इतकी आहे.
सहावा क्रमांक – रॉबर्ट डी नीरो (Robert De Niro)

रॉबर्ट डी नीरो हे जागतिक सिनेमातील एक मोठ नाव आहे. “टॅक्सी ड्रायव्हर”, “द गॉडफादर पार्ट टू” आणि “रेजिंग बुल” सारख्या चित्रपटांनी त्यांना अमरत्व बहाल केल. पण त्यांची संपत्ती फक्त अभिनयातून नाही, तर त्यांनी हॉलीवूडबाहेर केलेल्या व्यवसायांमुळे वाढली.
रॉबर्ट हे ग्लोबल रेस्टॉरंट चेन नोबूचे सहसंस्थापक आहेत. जगातील 40 शहरांमध्ये त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत, आणि त्यातून त्यांना चांगली कमाई होते. याशिवाय त्यांनी न्यूयॉर्कच्या रियल इस्टेट मार्केटमध्येही गुंतवणूक केली आहे, जे जगातील सर्वात महागड आणि स्पर्धात्मक मार्केट आहे. या सगळ्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 735.35 मिलियन डॉलर (सुमारे 6,200 कोटी रुपये) इतकी आहे.
सातवा क्रमांक- ब्रॅड पिट (Brad Pitt)

ब्रॅड पिट हे हॉलीवूडमधील एक सातत्यपूर्ण अभिनेता आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, आणि त्यांना बॉक्स ऑफिसवर चांगले चेक मिळतात. नुकताच त्यांनी “फॉर्म्युला वन” या चित्रपटासाठी 45 मिलियन डॉलर (सुमारे 379 कोटी रुपये) इतकी फी घेतली.
पण ब्रॅड यांची कमाई फक्त अभिनयापुरती मर्यादित नाही. त्यांनी त्यांच्या माजी पत्नी जेनिफर एनिस्टन यांच्यासोबत मिळून प्लॅन बी एंटरटेनमेंट नावाची प्रोडक्शन कंपनी सुरू केली. या कंपनीने “द डिपार्टेड” आणि “मूनलाइट” सारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामुळे ब्रॅड यांची संपत्ती 594 मिलियन डॉलर (सुमारे 5,000 कोटी रुपये) इतकी झाली आहे.
आठवा क्रमांक -जॅक निकल्सन (Jack Nicholson)

जॅक निकल्सन यांनी त्यांच्या करिअरमध्ये “द शायनिंग”, “फ्यू गुड मेन”, “द डिपार्टेड” आणि “एज गुड एज इट गेट्स” सारख्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण त्यांची संपत्ती फक्त अभिनयातून नाही, तर त्यांनी रियल इस्टेट आणि हाय-एंड आर्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे वाढली.
जॅक यांनी टिम बर्टनच्या “बॅटमॅन” चित्रपटासाठी एक खास डील केली होती, ज्यामध्ये त्यांनी बॉक्स ऑफिस शेअर आणि मर्चेंडाइजिंग रेव्हेन्यूचा हिस्सा घेतला. या डीलमुळे त्यांना 160 मिलियन डॉलर (सुमारे 1,350 कोटी रुपये) इतका फायदा झाला. आज त्यांच्या रियल इस्टेट आणि आर्ट गुंतवणुकीची किंमत 375 मिलियन डॉलर (सुमारे 3,150 कोटी रुपये) इतकी आहे, आणि एकूण संपत्ती 590 मिलियन डॉलर (सुमारे 4,900 कोटी रुपये) आहे.
हे वाचल का ? – घरामध्ये AC किंवा कूलर लावण्या आधी हे वाचा !
नववा क्रमांक – टॉम हँक्स (Tom Hanks)

टॉम हँक्स हे हॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. “फिलाडेल्फिया” आणि “फॉरेस्ट गंप” सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. टॉम यांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालंच, पण समीक्षकांनीही त्यांच्या कामाच नेहमीच कौतुक केल.
पण टॉम यांची संपत्ती फक्त अभिनयातून नाही, तर त्यांनी रियल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे वाढली. त्यांचा रियल इस्टेट पोर्टफोलिओ सुमारे 225 मिलियन डॉलर (सुमारे 1,900 कोटी रुपये) इतका आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 572 मिलियन डॉलर (सुमारे 4,800 कोटी रुपये) इतकी झाली आहे.
दहावा क्रमांक – जॅकी चॅन (Jackie Chan)

जॅकी चॅन हे जगातील सर्वात प्रसिद्ध एंटरटेनर्स पैकी एक आहेत. त्यांनी हॉंगकॉंगच्या Action Comedy चित्रपटांमधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली, आणि “रश आर”, “कुंग फू पांडा” आणि “द कराटे किड” सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली.
जॅकी चॅन यांनी अभिनयाबरोबरच त्यांचा व्यवसायही वाढवला. त्यांनी प्रोडक्ट इंडोर्समेंट आणि मूवी थिएटर चेनमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय, जॅकी चॅन यांनी घोषणा केली आहे की ते त्यांची सर्व संपत्ती चॅरिटीला दान करणार आहेत. आज त्यांची एकूण संपत्ती 557 मिलियन डॉलर (सुमारे 4,700 कोटी रुपये) इतकी आहे.
जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची ही यादी पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, की या अभिनेत्यांनी फक्त अभिनयातूनच नाही, तर व्यवसायातूनही प्रचंड संपत्ती कमावली आहे. मग ते आर्नोल्ड श्वार्झनेगर असतील, ज्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून बिलियन डॉलर कमावले, किंवा शाहरुख खान, ज्यांनी प्रोडक्शन आणि आयपीएल टीमच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढवली.
या सगळ्या अभिनेत्यांनी अभिनय आणि व्यवसाय यांचा सुंदर मेळ घालून स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवल आहे. तुम्हाला या यादीत कोणत्या अभिनेत्याच यश सर्वात प्रेरणादायी वाटलं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.