---Advertisement---

Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा झटका येण्याअगोदर शरीरामद्धे हे लक्षणे जाणवतात !

Heart Attack Symptoms : हृदयविकाराचा झटका येण्याअगोदर शरीरामद्धे हे लक्षणे जाणवतात !
---Advertisement---

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा म्हणजेच Heart Attack चा धोका वाढत चालला आहे. ही गोष्ट फक्त वयस्कर माणसांपुरतीच मर्यादित नाही, तर तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यावर आपण वेळीच त्याची लक्षणे ओळखली आणि त्यावर उपाय केले तर Heart Attack पासूनआपण वाचू शकतो.

WhatsApp Group Join Now

हृदयविकाराचे जे लक्षणे आहेत त्यांना कधीही दुर्लक्ष करू नये, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. याशिवाय, या लक्षणांचा अर्थ, त्यांच्यावर काय करावं, आणि आपण आपलं हृदय निरोगी कसं ठेवू शकतो, याबद्दलही चर्चा करणार आहोत.

हृदयविकार म्हणजे काय? (what is heart attack) :- हा एक असा आजार आहे ज्यामुळे हृदयाला लागणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकत आणि यावर जर वेळीच उपचार न मिळाले तर जीवावरही बेतू शकत.

पण ही गोष्ट लक्षात ठेवा की हृदयविकाराची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी दिसू शकतात. काहींना तीव्र वेदना होतात, तर काहींना हलकी अस्वस्थता जाणवते. म्हणूनच ही लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाच आहे. हृदयविकाराचा झटका येण्याअगोदर शरीरामद्धे हे लक्षणे जाणवतात याबाबत खाली माहिती दिलेली आहे.

छातीत दुखणे

छातीत दुखण हे हृदयविकाराच सर्वात सामान्य लक्षण मानल जात. यात छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाबण्यासारख, जडपणासारख किंवा जळ-जळणार दुखण जाणवू शकत. हे दुखण काही मिनिट राहत किंवा येऊन जात. काही लोकांना अस वाटत की त्यांना पोटात गॅस आहे किंवा अपचन झालय, पण जर हे दुखण बऱ्याच वेळा येत असेल तर ते हृदयविकाराच लक्षण असू शकत.

ही वेदना कधीकधी हातात, खांद्यावर, मानेवर किंवा हनुवटीपर्यंत पसरते. जर तुम्हाला अशी काही लक्षने जाणवत असतील, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काहींना ही वेदना इतकी हलकी असते की ते तिला गांभीर्याने घेत नाहीत, पण ही चूक जीवघेणी ठरू शकते.

श्वास घेण्यास त्रास होणे

हृदयविकाराच्या वेळी श्वास घ्यायला त्रास होण हे दुसऱ्या महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक आहे. तुम्हाला अचानक अस वाटू शकत की तुम्हाला पुरेसा श्वास मिळत नाही किंवा तुम्हाला जीव घाबरून गेल्यासारख वाटत. काही लोकांना तर झोपेतून अचानक जाग येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

हे वाचल का ? -  उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

ही समस्या हृदयाला रक्त पाठवण्यात अडचण येत असल्यामुळे उद्भवते. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि त्याबरोबर छातीमध्ये दुखण किंवा घाम येत असेल, तर हा हृदयविकाराकहा गंभीर इशारा असू शकतो.

थंडा घाम येणे किंवा चक्कर येणे

हृदयविकाराच्या वेळी अचानक थंडा घाम येण हे एक असामान्य पण महत्त्वाच लक्षण आहे. हा घाम जणू भीती किंवा तणावामुळे येत असल्यासारखा आपल्याला वाटत. काहीवेळा चक्कर येण, डोळ्यासमोर काळ पडण किंवा अशक्तपणा जाणवण असेही लक्षण जाणवतात.

काही लोकांना अस वाटत की हा घाम फक्त थंडीमुळे किंवा थकव्यासाठी आहे, पण जर हा घाम अचानक आणि बिनधास्त येत असेल, तर तो हृदयविकाराच संकेत असू शकतो.

पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेग-वेगळी असतात का?

हृदयविकाराची लक्षण पुरुष आणि स्त्रियांमध्ये थोड्या वेगळ्या दिसू शकतात. पुरुषांना छातीत दुखण आणि श्वास घेण्यास त्रास हे जास्त प्रमाणात जाणवत, तर स्त्रियांना काही वेगळी लक्षणही दिसू शकतात.

स्त्रियांमध्ये आढळणारी काही लक्षणे ? (Pre Heart Attack Symptoms Female)

स्त्रियांच्या बाबतीत हृदयविकाराचे लक्षण कधीकधी फार तीव्र नसतात. त्यांना छातीमध्ये दुखण्याऐवजी थकवा, मळ-मळ, पाठदुखी किंवा पोटात दुखण जाणवू शकत. काहींना उलट्या होण्याचा अनुभव येतो किंवा त्यांना अस्वस्थ वाटत. ही लक्षण इतकी सामान्य वाटतात की स्त्रिया त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. पण जर ही लक्षणं अचानक सुरू झाली आणि बऱ्याच वेळा येत असतील, तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता आहे.

हृदयविकार टाळण्यासाठी काय करावं? (How to Avoid Heart Attack)

हृदयविकाराची लक्षण ओळखण महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा त्यापासून वाचण जास्त गरजेच आहे. आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आपण हृदयाचे आरोग्य जपू शकतो.

जेवणामध्ये निरोगी आहाराची निवड करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जेवणातून तळलेले पदार्थ, जास्त चरबी आणि साखर यांचा वापर कमी करावा. फळं, भाज्या, साबुत धान्य आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असलेली खाद्यपदार्थं जसं की मासे आणि काजू खाणं फायदेशीर ठरतं. सकाळी थोड्या वेळाने चहा किंवा कॉफीऐवजी हिरव्या पालेभाज्यांचा रस किंवा फळांचा रस प्यायल्याने हृदयाला चांगला फायदा होतो.

हे वाचल का ? -  UPI ट्रान्झॅक्शन्सवर 18% GST? सत्य काय आहे ते जाणून घ्या!

हे वाचल का ? तुमच्या नावावर किती सिम कार्डस् आहेत तपासल का?

नियमित व्यायाम करा

दररोज 30 मिनिट चालण, योगा करण किंवा हलके व्यायाम करा यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारत आणि व्यायामामुळे रक्तप्रवाह चांगला होतो तसेच हृदयावरचा ताण सुद्धा कमी होतो. पण जिममध्ये जास्त ताण घेण टाळावं, कारण काही वेळा अति व्यायामामुळे हृदयाला धोका होऊ शकतो.

तणाव आणि झोपेची काळजी घ्या

आजकालच्या जीवनात तणाव हा हृदयविकाराचा मोठा कारणीभूत ठरतो. मेडिटेशन, प्राणायाम किंवा गाण ऐकण यामुळे मन शांत राहत. त्याचबरोबर रात्री 7-8 तासांची झोप घेणही महत्त्वाच आहे, कारण झोपेच्या अभावामुळे हृदयावर ताण येतो.

हृदयविकाराच्या वेळी काय करावं? (What to do during a heart attack?)

जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराची लक्षण जाणवत असतील, तर घाबरू नका. प्रथम, व्यक्तीला शांत बसवून त्याला आराम द्यावा. जर शक्य असेल तर त्याच्या छातीवर हलक्या हाताने दाब द्यावा आणि खोल श्वास घ्यायला सांगावा. ही पद्धत कफ सीपीआर म्हणून ओळखली जाते.

त्यानंतर लगेच वैद्यकीय मदत घेण्यासाठी दवाखान्यात जाण्याची तयारी करा. दवाखान्यामध्ये पोहोचण्यापूर्वी व्यक्तीला कोणतीही औषधं देऊ नये, कारण त्यामुळे स्थिती बिघडू शकते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टर तपासणी करून हृदयाचा वेग, रक्तदाब आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) चाचणी करतात. जर हृदयविकाराची शक्यता आढळली, तर त्वरित औषधं किंवा अँजिओप्लास्टी सारखे उपचार सुरू केले जातात.

हृदयविकाराचा झटका कोणत्या कारणामुळे होतो ? (Reason for Heart Attack)

हृदयविकाराचा धोका काही विशिष्ट कारणांमुळे वाढतो. धुम्रपान, मद्यपान, जास्त तणाव आणि व्यायामाचा अभाव हे हृदयविकाराचे मुख्य कारण आहेत. तरुणांमध्येही अशा सवयींमुळे हृदयाचे आरोग्य बिघडत आहे.

जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयविकार झाला असेल, तर तुम्हाला त्याचा धोका जास्त आहे. वय वाढल्यावरही हृदयविकाराची शक्यता वाढते, पण आता 30-40 वयोगटातही हा धोका दिसतो. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह या आजारांमुळे हृदयावर ताण येतो. या आजारांचा नियंत्रण न केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे वाचल का ? -  Personality: व्यक्तिमत्व १० पटीने सुधारण्यासाठी १०+ प्रभावी टिप्स

लक्षणांना गांभीर्याने घ्या टाळा-टाळ करू नका

हृदयविकाराबद्दल लोकांमध्ये अजूनही बऱ्याच गोष्टींबद्दल जागरूकता नाही. काहींना त्याची लक्षण समजत नाहीत, तर काहींना डॉक्टरांकडे जाण्याची लाज वाटते. पण एका 45 वर्षीय व्यक्तीने सांगितल की त्याला छातीमध्ये हलक दुखण जाणवल, पण त्याने त्याकडे लक्ष दिल नाही. नंतर ती वेदना वाढली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याच समजल. अशा अनुभवांमुळे लोकाना समजत की वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहण आणि लक्षणांना गांभीर्याने घेण महत्त्वाच आहे.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कुटुंबाची भूमिका

हृदयविकारापासून वाचण्यासाठी फक्त वैयक्तिक प्रयत्न पुरेसे नाहीत, तर कुटुंबाचाही सहभाग महत्त्वाचा आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना निरोगी सवयींची प्रेरणा द्यावी. उदा., घरात तळलेले पदार्थ कमी करून भाज्या आणि फळांचा समावेश करावा. मुलांना लहानपणापासून व्यायामाची सवय लावावी आणि तणावमुक्त वातावरण निर्माण करावं.

हृदयविकाराची लक्षणं ओळखण आणि त्यावर वेळीच उपाय करण हे आपल्या हातात आहे. छातीत दुखण, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम येण यांसारखी लक्षण दुर्लक्ष करू नका. आपल्या जीवनशैलीत बदल करून, नियमित व्यायाम आणि निरोगी आहार घेऊन आपण आपलं हृदय सुरक्षित ठेवू शकतो.

तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला अशी लक्षण जाणवली असतील तर घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल आयुष्य मौल्यवान आहे, त्याची काळजी घ्या!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment