आजकाल उन्हाळा किंवा गरमीच्या दिवसांत आपण सगळे थंडाव्यासाठी काही ना काही उपाय शोधत असतो. कोणाला AC (Air Conditioner) आवडत, तर कोणाला Cooler. पण तुम्हाला माहिती आहे का, की थंडावा मिळवताना हवेत ओलावा असण किती महत्त्वाच आहे? जर हवेत ओलावा नसेल, तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि फुफ्फुसांना जळजळ होऊ शकते. आपण AC आणि Cooler यांच्यातील फरक, हवेत ओलाव्याच महत्व आणि तुमच्या घरात थंडावा कसा राखायचा, याबद्दल सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.
हवेत ओलावा का आवश्यक आहे?
हवेत ओलावा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायच झाल, तर हवेत पाण्याची वाफ असते, ज्याला आपण ओलावा म्हणतो. मराठी भाषेत याला “ओलावा” आणि इंग्रजीत “Humidity” म्हणतात. हा ओलावा हवेत असण खूप महत्त्वाच आहे. जर हवेत ओलावा नसेल, तर हवा खूप कोरडी होते आणि आपल्याला श्वास घेताना त्रास होतो. कोरड्या हवेमुळे आपल्या फुफ्फुसांना जळजळ होऊ शकते आणि आपल्याला अस्वस्थ वाटत. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला खूप गरम आणि कोरडी हवा लागते, जी शरीरासाठी त्रासदायक असते. पण जर हवेत थोडा ओलावाअसेल, तर तापमान थोड कमी वाटत आणि आपल्याला बर वाटत.
हे वाचल का ? घरबसल्या आधार कार्डला बँक खाते कस लिंक करायच? अगदी सोपी प्रक्रिया
हवेत ओलावा कसा येतो?
हवेत ओलावा कसा येतो ?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपण जेव्हा श्वास सोडतो, तेव्हा त्यात थोडा ओलावा असतो, जो हवेत मिसळतो. याशिवाय, आपण जेव्हा कपडे वाळू घालतो, तेव्हा त्यातल पाणी हवेत जाते. कुकरातून निघणारी वाफ, पाण्याच बाष्पीभवन, आणि इतर अनेक गोष्टींमुळे हवेत ओलावा तयार होतो. थंडीच्या दिवसात धुक पडत, तेव्हा हवेत ओलाव्याच प्रमाण वाढत, आणि आपल्याला हाताला पाणी लागत.
कूलर कस काम करत?
आता आपण पाहूया की कूलर हवेत ओलावा कस टाकत आणि ते कस काम करत. कूलर हे एक सोप आणि स्वस्त साधन आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसांत थंड हवा देण्यासाठी वापरल जात. कूलरमध्ये एक पंखा असतो, एक पाण्याची टाकी असते, आणि बाजूंना जाळी असते, ज्याला आपण “पडदा” म्हणतो.
कूलरमध्ये एक मोटर असते, जी पाण्याच्या टाकीतून पाणी वर उचलते आणि ते जाळीवर सोडते. ही जाळी ओली होते, आणि जेव्हा पंखा चालतो, तेव्हा हवा या ओल्या जाळीतून आत येते. ओल्या जाळीतून हवा गेल्यामुळे ती थंड होते आणि त्यात नमी मिसळते. ही थंड आणि ओलसर हवा आपल्याला बरं वाटायला मदत करते.
पण कूलरचा एक तोटा आहे, तो म्हणजे तो हवेत किती ओलावा टाकायचा, हे नियंत्रित करू शकत नाही. जर हवेत आधीच जास्त ओलावा असेल, तर कूलर जास्त पाणी टाकत आणि मग खोलीत पाण्याचे थेंब पडायला लागतात. यामुळे कूलर कधी कधी “पागल” झाल्यासारख वाटत, कारण तो गरजेपेक्षा जास्त किंवा कमी ओलावा टाकतो.
AC कस काम करत?
आता आपण एसीबद्दल बोलूया. AC (एअर कंडिशनर) हे कूलरपेक्षा वेगळ आणि आधुनिक साधन आहे. एसीमध्ये तापमान आणि ओलावा मोजण्यासाठी सेन्सर्स असतात. म्हणजे, एसीला हवेत किती ओलावा आहे, हे कळत आणि तो त्यानुसार काम करतो.
एसी हवा थंड करतो आणि त्याचबरोबर हवेतली जास्त ओलावा काढून टाकतो. जर हवेत ओलावा जास्त असेल, तर एसी तो कमी करतो आणि आपल्याला कोरडी आणि थंड हवा देतो. पण जर हवेत ओलावा खूप कमी असेल, तर एसी त्यात थोडा ओलावा टाकू शकतो, ज्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला सोप जात.
हे वाचल का ? घरबसल्या जॉब कार्ड कस काढायचं? संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत
एसी कूलरपेक्षा जास्त चांगल नियंत्रण करतो, पण त्याचे काही तोटेही आहेत. एसी खूप महाग आहे, आणि त्याचा विजेचा खर्चही जास्त आहे. याशिवाय, एसीला दरवर्षी सर्व्हिसिंग करावी लागते, कारण त्यात धूळ साठते आणि त्यातील गॅस संपतो. जर सर्व्हिसिंग केली नाही, तर एसी नीट हवा देत नाही आणि खराब होऊ शकतो.
एसी आणि कूलर काय निवडाव?
आता प्रश्न येतो की एसी आणि कूलर यापैकी काय निवडाव? याच उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुमच बजेट कमी असेल, तर कूलर हा चांगला पर्याय आहे. कूलर स्वस्त आहे आणि लाइन चा खर्चही कमी आहे. पण जर तुम्हाला हवेत ओलावा आणि तापमान यांच परफेक्ट नियंत्रण हव असेल, तर एसी चांगला आहे.
एसी आणि कूलर यापैकी काय निवडायचं, हे तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून आहे. हवेत ओलावा असणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही कूलर किंवा एसी यापैकी योग्य पर्याय निवडू शकता.