कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

कुणाल कामराच्या गाण्यामुळे राजकीय वातावरण तापले

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग्य करणारे गाणे सादर केले. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणि शिंदे समर्थक अधिकच तापले आहे. शिंदे समर्थकांकडून या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे, कुणाल कामराच्या चाहत्यांनी त्यांच्या यूट्यूबवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत पाठवली आहे.

WhatsApp Group Join Now

गाण्याची पार्श्वभूमी आणि त्याचा आशय

कुणाल कामराने आपल्या नव्या व्यंग्यात्मक गाण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या गाण्यात महाराष्ट्रातील राजकीय उलथा-पालथ, शिवसेना पक्षातील फूट आणि सत्तांतराच्या प्रक्रियेवर टीका केली आहे. कुणाल कामराच्या या गाण्यात शिंदेंच्या कार्यशैलीवर उपहासात्मक भाष्य करण्यात आले आहे.

कुणाल कामराने गायलेल्या गाण्यातील काही ओळी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि त्यांच्या समर्थकांकडून यावर गाण्यावर तीव्र आक्षेप आणि नाराजी नोंदवली गेली आहे. काही समर्थकांनी सोशल मीडियावर कामराच्या गायलेल्या गाण्याच्या विरोधात ट्रेंड चालवला आहे, तर काहींनी प्रत्यक्षात आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड

कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यावरून राजकीय वाद: समर्थकांकडून लाखोंची देणगी, शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया

Source :- indiatoday

या गाण्यावर झालेल्या वादानंतर, कामराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये काही शिंदे समर्थकानी व आंदोलकांनी तोड-फोड केली. आणि हॉटेलमध्ये घुसून हॉटेलमधील खुर्च्या – टेबल यांची तोड – फोड करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. शिंदे समर्थकांचा आरोप आहे की, कुणाल कामरा हे जाणीवपूर्वक त्यांच्या नेत्याचा (श्री एकनाथ शिंदे) यांचा अपमान करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.

सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. अनेक नेटकऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून कुणाल कामराला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी त्यांची भाषा आणि शैली अयोग्य असल्याची टीका केली आहे. तसेच ट्विटर आणि फेसबुकवर #KunalKamra, #EknathShinde आणि #FreedomOfSpeech ह्या हॅशटॅग चे ट्रेंड पाहायला मिळाले आहे.

हे वाचल का ? -  Third Mumbai : तिसरी मुंबई? होय, महाराष्ट्राला मिळणार नवे 'शहर'!

कुणाल कामराच्या समर्थनार्थ लाखोंची देणगी

या वादानंतर कुणाल कामराच्या समर्थकांनी त्यांच्या YouTube चॅनेलवर लाखोंच्या देणग्या दिल्या आहेत. याबाबत स्वतः कुणाल कामराने आपल्या सोशल मीडिया वर दिली आहे. या समर्थनाबद्दल “मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे. लोकांनी मला त्यांच्या कृतीतून पाठिंबा दिला आहे. मी हे गाणे कोणाला दुखावण्यासाठी नाही, तर सत्तेवर टीका करण्याच्या उद्देशाने बनवले आहे.” असे कामराने म्हटले आहे.

शिंदे गटाची भूमिका आणि प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “कुणाल कामराने कोणाची तरी सुपारी घेऊन हे गाणे बनवले आहे. ही एक राजकीय खेळी आहे आणि अशा गोष्टींना आम्ही जास्त महत्त्व देणार नाही.”

शिंदे गटाच्या इतर नेत्यांनीही यावर भाष्य केले असून, अशा गोष्टींना थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. काहींनी तर थेट कामराच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षांची प्रतिक्रिया

कुणाल कामराच्या या गाण्यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर टीका केली आहे. की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणे हा लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांचा अपमान आहे. जर कोणी राजकीय टीका केली, तर त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा विषय विधीमंडळात सुद्धा गाजला आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आणि सांगितले की, महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली जात आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र याला फाजील महत्त्व दिले जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा

हा प्रकार म्हणजे कलाकार आणि व्यंग्यकारांच्या अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्यावर घाला आहे का ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तसेच काही लोकांचे मत आहे की, सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हा लोकशाहीचा एक भाग आहे आणि कुणाल कामराने तेच केले आहे. तर, काही लोकांचे मत आहे की, अशा प्रकारे थेट टीका करणे हा असभ्यपणाचा भाग आहे.

हे वाचल का ? -  iOS 26 Update - आयफोनचा अनुभव नव्या उंचीवर, iOS 26 मध्ये काय आहे खास? वाचा सविस्तर माहीती

कुणाल कामराच्या व्यंग्यात्मक गाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे, कुणाल कामराच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देऊन त्यांचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी आक्रमक पद्धतीने विरोध दर्शवला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment