पशुसंवर्धन विभागाची खास योजना, शेळी, गाय, म्हैस आणि कुकुटपालनासाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान!

पशुसंवर्धन विभागाची खास योजना, शेळी, गाय, म्हैस आणि कुकुटपालनासाठी 50% ते 75% पर्यंत अनुदान!

पशुसंवर्धन विभागाने 2025 साठी एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अनुदान दिलं जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेळी, गाय, म्हैस आणि कुकुटपालनासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत, आणि आज आपण या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now

या योजनेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळेल, तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळणार आहे. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 आहे.

पशुसंवर्धन विभागाची योजना – काय आहे खास?

पशुसंवर्धन विभाग दरवर्षी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतो, ज्यामुळे त्यांना पशुपालनातून आर्थिक लाभ मिळू शकेल. 2025 साठी सुरू करण्यात आलेली ही नाविन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांना शेळी, गाय, म्हैस आणि कुकुटपालनासाठी अनुदान दिल जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण आणि त्यांच उत्पन्न वाढवन्याबबत उद्देश आहे.

या योजनेत सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळेल, तर अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळणार आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही या योजनेतून शेळी किंवा गाय घेतली, तर त्याच्या किमतीपैकी 50% किंवा 75% रक्कम सरकार देईल, आणि बाकीची रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागेल. ही योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन्ही पातळीवर राबवली जाते, आणि वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळं अनुदान दिलं जातं.

ऑनलाइन अर्जाची वेळ आणि पात्रता यादी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्जाची प्रक्रिया 3 मे 2025 पासून सुरू झाली आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी 2 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. म्हणजेच, तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचंनाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे 2 जुलैला समजेल.

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच वय 18 वर्षांपेक्षा जास्त असाव, आणि एका आधार कार्डवर आणि एका मोबाईल नंबरवर फक्त एकदाच अर्ज करता येईल. म्हणजेच, एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्ही SC किंवा ST प्रवर्गातून अर्ज करत असाल, तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड कराव लागेल.

हे वाचल का ? -  घरबसल्या जॉब कार्ड कस काढायचं? संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया- स्टेप बाय स्टेप माहिती

आता आपण पाहूया की या योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा भरायचा. ही प्रक्रिया खूप सोपी आहे, आणि तुम्ही घरबसल्या तुमचा अर्ज भरू शकता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला होम पेजवर ‘योजनेसाठी अर्जदार नोंदणी’ हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकता.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुमच पूर्ण नाव, वडील किंवा पतीच नाव, आडनाव, आणि लिंग निवडाव लागेल. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल, जो बदलता येणार नाही, त्यामुळे तो काळजीपूर्वक टाका. जर तुमच्याकडे ईमेल आयडी असेल, तर ती टाका, अन्यथा हा पर्याय रिकामा ठेवा.

पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडाव लागेल. त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागेल, म्हणजेच तुम्ही ओपन, SC किंवा ST मधील कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात. जर तुम्ही SC किंवा ST मधून अर्ज करत असाल, तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड कराव लागेल. जर तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असाल, तर ‘होय’ निवडा आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्वाच प्रमाणपत्र अपलोड करा. या योजनेत दिव्यांगांसाठी 3% जागा राखीव आहेत.

अर्ज भरताना तुम्हाला काही महत्त्वाच्या माहिती आणि कागदपत्रांची गरज लागेल. जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील (BPL) असाल, तर ‘होय’ निवडा आणि तुमचा BPL यादीतील क्रमांक टाका. हा क्रमांक तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीतून मिळेल. त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता निवडा, म्हणजेच तुमच शिक्षण किती झाल आहे.

पुढे तुम्हाला तुमच शेतीच क्षेत्र हेक्टरमध्ये नमूद कराव लागेल. त्यानंतर तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या बँक खात्याची माहिती टाकावी लागेल, जस की बॅंकेचं नाव (उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया), खाते क्रमांक, IFSC कोड आणि शाखेचं नाव. ही सर्व माहिती तुमच्या बँक पासबुकवरून पाहून काळजीपूर्वक टाका.

हे वाचल का ?घरबसल्या आधार कार्डला बँक खाते कस लिंक करायच? अगदी सोपी प्रक्रिया

हे वाचल का ? -  महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर : या जिल्ह्यांना दिला आहे वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट!

त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. फोटो 80 KB पेक्षा कमी आकाराचा आणि स्वाक्षरी 40 KB पेक्षा कमी आकाराची असावी. ही फाइल JPG किंवा PNG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावी लागेल, जसं की रेशन कार्डवरील पुरुष आणि स्त्रियांची संख्या, त्यांचे नाव, आधार क्रमांक, लिंग आणि वय. ही माहिती रेशन कार्डनुसारच भरावी.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला योजना निवडावी लागेल. या योजनेत शेळी, गाय, म्हैस आणि कुकुटपालनासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, आणि तुमच्या जातीप्रवर्गानुसार तुम्हाला त्या दिसतील. योजना निवडल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ, तुम्ही महिला बचत गटाच्या सदस्य आहात का? जर होय, तर गटाच नाव लिहा, अन्यथा ‘नाही’ निवडा.

पुढे तुम्हाला विचारल जाईल की तुम्ही भूमिहीन आहात का? जर तुमच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल, तर ‘होय’ निवडा आणि क्षेत्र नमूद करा. तुम्ही दारिद्र्यरेषेखालील आहात का? जर होय, तर BPL यादीतील क्रमांक टाका. तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात का? जर होय, तर स्वयंरोजगार पोर्टलवरील नोंदणी क्रमांक टाका.

यानंतर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पशुधनाची माहिती द्यावी लागेल, जसं की संकरित गाय, देशी गाय, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या. जर तुमच्याकडे पशुधन नसेल, तर शून्य टाका. तुमच्याकडे शेळी किंवा मेंढ्यांसाठी वाडा आहे का? जर होय, तर तो कच्चा, पक्का की गवती छपराचा आहे, हे नमूद करा. तुम्ही शेळीपालनाच प्रशिक्षण घेतल आहे का? जर होय, तर प्रशिक्षणाच प्रमाणपत्र अपलोड करा.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला नियम आणि अटी वाचाव्या लागतील. या नियमांमध्ये अस लिहिलेल आहे की, तुम्ही दिलेली सर्व माहिती खरी आहे, आणि जर तुमच प्रकरण मंजूर झाल, तर एका महिन्याच्या आत शेळी किंवा मेंढी खरेदी करण्याची जबाबदारी तुमची असेल. हे सर्व वाचून तुम्हाला ‘नियम आणि अटी मला मान्य आहेत’ या चेकबॉक्सवर टिक कराव लागेल.

यानंतर ‘पुढे चला’ या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या अर्जाचा Preview दाखवला जाईल, जिथे तुम्ही सर्व माहिती पुन्हा एकदा तपासू शकता. जर काही बदल करायचा असेल, तर ‘बदल करा’ वर क्लिक करा, आणि जर सर्व माहिती बरोबर असेल, तर ‘जतन करा’ वर क्लिक करा. जतन केल्यानंतर तुम्हाला एक Pop-Up दिसेल, ज्यामध्ये ‘आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे’ असा संदेश येईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल, जो तुम्ही प्रिंट करून ठेवू शकता.

हे वाचल का ? -  महाराष्ट्र हवामान अंदाज : कोकणात मुसळधार पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज

अर्ज जतन केल्यानंतर तुमची निवड रँडमाइझ पद्धतीने केली जाईल. जर तुमचं नाव पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आल, तर तुम्हाला 2 जुलै 2025 रोजी एसएमएसद्वारे किंवा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत कळवल जाईल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील, जस की आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, आणि जात प्रमाणपत्र (जर लागू असेल).

या योजनेतून मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत शेळी, गाय किंवा मेंढी खरेदी करावी लागेल, आणि त्यासाठी लागणारी उर्वरित रक्कम स्वतः उभी करावी लागेल. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेत असाल, तर त्याची माहितीही अर्जात नमूद करावी लागेल.

या योजनेचं महत्त्व आणि फायदे

पशुसंवर्धन विभागाची ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वयंरोजगाराची संधी देणं. पशुपालनामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं, आणि त्यांना शेतीबरोबरच दुसरा आर्थिक आधार मिळतो. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे, कारण पशुपालन हा त्यांच्यासाठी एक पारंपरिक व्यवसाय आहे.

या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे अनुदान. 50% किंवा 75% अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार कमी होतो, आणि त्यांना पशुपालन सुरू करणं सोपं होतं. याशिवाय, या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही मिळतं, ज्यामुळे त्यांना पशुपालनात यश मिळण्याची शक्यता वाढते.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी. सर्वप्रथम, अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक आणि खरी भरावी. जर माहिती खोटी आढळली, तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. दुसर, सर्व आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत, जस की आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, आणि जात प्रमाणपत्र.

तसेच, अर्ज जतन केल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक आणि प्रिव्ह्यूची प्रिंट काढून ठेवावी. जर तुमच नाव पात्र यादीत आल, तर तुम्हाला कागदपत्र सादर करण्यासाठी वेळ कमी मिळेल, त्यामुळे आधीच सर्व तयारी करून ठेवा. याशिवाय, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे अपडेट्स तपासत राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल.

सादर अर्ज कसा भरायचा याबाबत संपूर्ण विडियो

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment