घर बसल्या मतदान कार्ड कसे काढावे ? जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

मतदान कार्ड कसे काढावे याबाबत मार्गदर्शन

आजच्या काळात मतदान कार्ड फक्त मतदानासाठीच नाही, तर अनेक सरकारी कामांसाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणूनही खूप महत्त्वाच आहे. मग ती सरकारी योजना असो, ओळख पटवण असो, किंवा तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा दाखवण असो, मतदान कार्ड तुम्हाला खूप उपयोगी पडत.

WhatsApp Group Join Now

पण हे मतदान कार्ड कसे काढावे, याची माहिती अनेकांना नसते. काहींना वाटत की यासाठी सरकारी ऑफिसात जाव लागेल, पण आता तस नाही! तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेमतदान कार्डसाठी अर्ज करू शकता. मी तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या मराठीत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तुमच न मतदान कार्ड बनवू शकाल.

मतदान कार्ड का गरजेच आहे?

मतदान कार्ड हे तुमच्यासाठी एक खास ओळखपत्र आहे. हे कार्ड तुम्हाला भारतात मतदानाचा अधिकार देत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या देशाच्या भविष्यासाठी योग्य नेत्याची निवड करू शकता. पण याशिवायही या कार्डाचे अनेक फायदे आहेत. उदा., जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, जस की शिष्यवृत्ती, आर्थिक मदत किंवा इतर कोणतीही सुविधा, तर मतदान कार्ड तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून काम करत.

हे वाचला का ? घरबसल्या आधार कार्डला बँक खाते कस लिंक करायच? अगदी सोपी प्रक्रिया

याशिवाय, बँक खातं उघडण्यासाठी, पासपोर्ट बनवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही सरकारी कामासाठी मतदान कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणूनही काम करत. म्हणूनच सगळ्यांना हे कार्ड बनवण खूप गरजेच आहे.

मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो, आणि तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे मतदान कार्ड (असल्यास). हे पूर्ण कागदपत्रे मतदान कार्ड काढताना तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.

मतदान कार्ड ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

आता आपण पाहणार आहोत की मतदान कार्डसाठी अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि खूप सोपी सुद्धा आहे. तुम्हाला फक्त तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन लागेल.

सर्वप्रथम, तुम्ही तुमच ब्राउझर उघडा, जस की गुगल क्रोम. त्यात सर्च बारमध्ये “Voter ECI” अस टाइप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाइट दिसेल, जी भारत निवडणूक आयोगाची (Election Commission of India) अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटवर क्लिक करा. जर तुम्हाला ही वेबसाइट सापडत नसेल, तर काळजी करू नका. या वेबसाइटची थेट लिंक तुम्हाला खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक खात तयार कराव लागेल. यासाठी “Sign-Up” हा पर्याय निवडा. साइन अप पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. याशिवाय, जर तुम्हाला हव असेल तर तुमचा ईमेल आयडी सुद्धा टाकू शकता, पण ईमेल आयडी टाकण बंधनकारक नाही.

मोबाइल नबर टाकल्यानंतर खाली Captch Code कोड दिसेल. हा कोड काळजीपूर्वक टाका. जर कोड मोठ्या अक्षरात (कॅपिटल) असेल, तर तसाच टाका, आणि लहान अक्षरात असेल, तर तसाच टाका. सर्व माहिती टाकल्यानंतर “Continue” बटणावर क्लिक करा.

हे वाचल का ? -  Post Office RD Scheme : दरमहा 100 रुपये गुंतवा यांनी मिळवा चांगला परतावा

हे वाचल का ? घरकुल योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
आता तुम्हाला तुमच नाव टाकायच आहे. तुमच पहिल नाव आणि आडनाव टाका. मग एक पासवर्ड तयार करा, जो तुम्हाला हवा तसा असू शकतो. हा पासवर्ड पुन्हा “Confirm Password” पर्यायात टाका आणि “Request OTP” बटणावर क्लिक करा.

तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून “Verify” बटणावर क्लिक करा. ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर तुमच खात तयार होईल. आता तुम्ही पुन्हा त्या मोबाइल नंबरने लॉगिन करू शकता.

लॉगिन केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवर याल. इथे तुम्हाला “New Registration” हा पर्याय दिसेल. नवीन मतदान कार्डसाठी तुम्हाला “Form No 6” हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडेल. फॉर्ममध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच राज्य निवडायच आहे. मग तुमचा जिल्हा आणि विधानसभा क्षेत्र निवडा. ही माहिती टाकल्यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच नाव टाकायच आहे. हे नाव तुमच्या आधार कार्डावर जस आहे, तसच टाका. तुमच पहिल नाव, मधल नाव (जर असेल तर), आणि आडनाव टाका. जर मधल नाव नसेल, तर फक्त पहिल नाव आणि आडनाव टाकायच आहे. ही माहिती टाकल्यानंतर ती आपोआप स्थानिक भाषेत (जस की मराठी) भाषांतरित होईल.

आता तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो तुमच्या मतदान कार्डवर येणार आहे, त्यामुळे हा फोटो चांगला आणि स्पष्ट असावा. तुम्ही तुमच्या मोबाइलने हा फोटो काढू शकता, पण त्याचा आकार जास्तीत जास्त 2 MB पेक्षा कमी असावा.

फोटो निवडल्यानंतर “Choose File” पर्यायावर क्लिक करा. फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला तो Zoom किंवा Rotate करून व्यवस्थित करायचा आहे. सर्व काही नीट झाल्यावर “Save” बटणावर क्लिक करा. फोटो यशस्वीपणे अपलोड झाल्यावर “Human Face Detected” असा संदेश येईल. मग “Next” बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच्या नातेवाईकाच नाव टाकायच आहे. जर तुम्ही अविवाहित असाल, तर तुमच्या वडिलांच नाव टाका. जर तुम्ही विवाहित असाल आणि महिला असाल, तर तुमच्या पतीच नाव टाकायच आहे. नाव टाकल्यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.

हे वाचल का ? -  तुमच्या नावावर किती सिम कार्डस् आहेत तपासल का?

पुढे तुम्हाला तुमचा संपर्क तपशील टाकायचा आहे. सर्वप्रथम तुमचा मोबाइल नंबर टाका. हा नंबर तुमचा स्वतःचा आहे की कुटुंबातील सदस्याचा, हे सांगा. जर तुमचा स्वतःचा असेल, तर “Self” पर्याय निवडा. याशिवाय, तुमचा ईमेल आयडी टाकू शकता, ज्यावर तुम्हाला मतदान कार्डची डिजिटल कॉपी मिळेल. सर्व माहिती टाकल्यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. 12 अंकी आधार क्रमांक टाकून “Next” बटणावर क्लिक करा. जर तुमच्याकडे आधार नसेल, तर “I am not able to furnish my Aadhaar Number because I don’t have Aadhaar Number.” हा पर्याय निवडा.

पुढे तुम्हाला तुमच लिंग (पुरुष/महिला) आणि जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकण्यासाठी कॅलेंडरमधून वर्ष, महिना आणि तारीख निवडा. याशिवाय, जन्मतारीखेचा पुरावा म्हणून एक कागदपत्र अपलोड करायच आहे. यासाठी तुम्ही आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा 10 वीची मार्कशीट अपलोड करू शकता.

कागदपत्र निवडल्यानंतर “Choose File” पर्यायावर क्लिक करा आणि ते अपलोड करा. लक्षात ठेवा, जर तुम्ही आधार अपलोड करत असाल, तर ते इंटरनेटवरून डाउनलोड केलेल नसाव, कारण त्यावर पासवर्ड असतो. पासवर्ड काढूनच अपलोड करा. सर्व काही झाल्यावर “Next” बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे. तुमचा घराचा क्रमांक, गावाच नाव, पोस्ट ऑफिसच नाव, पिन कोड, तालुका, जिल्हा आणि राज्य निवडा. जर तुम्हाला घराचा क्रमांक माहिती नसेल, तर तुमच्या कुटुंबातील इतर मतदान कार्ड वरून तो पाहू शकता.

पत्त्याचा पुरावा म्हणून एक कागदपत्र अपलोड करायचं आहे. यासाठी तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, वीज बिल, पाणी बिल किंवा गॅस कनेक्शनची पासबुक अपलोड करू शकता. कागदपत्र अपलोड केल्यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.

आता तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची माहिती टाकायची आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणाच मतदान कार्ड असेल, तर त्याच नाव, त्यांच्याशी तुमच नात आणि त्यांचा मतदान कार्ड क्रमांक (EPIC नंबर) टाका. यामुळे तुमच नाव त्यांच्याशी जोडल जाईल. जर कोणाच कार्ड नसेल, तर हा पर्याय रिकामा ठेवा आणि “Next” बटणावर क्लिक करा.

हे वाचल का ? -  एलॉन मस्कची टेस्ला कंपनीचे साताऱ्यात आगमन ! टेस्लाची भारतातील रणनीती काय वाचा सविस्तर माहिती

शेवटी घोषणा पर्यायात तुम्हाला तुमच्या गावाच किंवा शहराच नाव, राज्य आणि जिल्हा टाकायचा आहे. याशिवाय, तुम्ही या पत्त्यावर किती वर्षांपासून राहत आहात, हे सांगा. जर तुम्ही जन्मापासून तिथे राहत असाल, तर तुमच्या जन्मतारीखेच वर्ष निवडा. सर्व माहिती टाकल्यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.

शेवटी एक कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि “Sent OTP” बटणावर क्लिक करायच आहे. तुमच्या मोबाइलवर पुन्हा एक ओटीपी येईल, तो टाकून “Preview and Submit” बटणावर क्लिक करा. आता तुमचा अर्ज एका पीडीएफ स्वरूपात दिसेल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती आणि फोटो असेल.

सर्व माहिती नीट तपासा. जर काही चूक असेल, तर “Keep Editing” पर्यायावर क्लिक करून ती दुरुस्त करा. सर्व काही बरोबर असेल, तर “Submit” बटणावर क्लिक करा आणि “होय” पर्याय निवडा. तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल, जो तुम्ही डाउनलोड करून ठेवा.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवस वाट पाहावी लागेल. या काळात निवडणूक आयोग तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. तुमच्या गावातील BLO ( Booth Level Officer) व्हेरिफिकेशन करेल. ग्रामीण भागात काही वेळा BLO स्वतःच व्हेरिफिकेशन करतात, तर शहरात ते प्रत्यक्ष भेट देतात.

व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमच नाव वोटर लिस्टमध्ये समाविष्ट होईल. तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक SMS येईल, आणि तुम्ही “E-EPIC Download” पर्यायावरून तुमच डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करू शकता.

तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासू शकता. यासाठी वेबसाइटवर “Track Application Status” पर्यायावर जा. तिथे तुमचा रेफरन्स नंबर टाकून “Submit” बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कळेल. जर अर्ज नाकारला असेल, तर त्याच कारणही दिसेल.

मतदान कार्ड मिळण्याची प्रक्रिया

डिजिटल मतदान कार्ड तुम्हाला 10-15 दिवसांत मिळेल, पण प्रत्यक्ष कार्ड मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. काही राज्यांमध्ये हे कार्ड 1 महिन्यात मिळत, तर काही ठिकाणी जास्त वेळ लागतो. जर तुमच्या राज्यात निवडणुका असतील, तर हे कार्ड लवकर मिळण्याची शक्यता आहे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही अर्ज केला का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment