---Advertisement---

Ola Electric वर मोठ संकट !, Maharashtra RTO च्या कार्यवाही मुळे 100 पेक्षा जास्त शोरुम होणार बंद ?

Ola Electric वर मोठ संकट !, Maharashtra RTO च्या कार्यवाही मुळे 100 पेक्षा जास्त शोरुम होणार बंद ?
---Advertisement---

भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एकेकाळी आघाडीवर असलेली कंपनी Ola Electric ला सध्या अनेक अडचणींना सामोरं जाव लागत आहे. 2024 च्या सुरुवातीला Ola Electric चा मार्केट शेअर 50 टक्क्यांहून जास्त होता, पण वर्षभरात त्यात मोठी घट झाली.

WhatsApp Group Join Now

आता 2025 मध्ये तर Ola Electric च्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रात परिवहन विभागाने (RTO) ओलावर कठोर कार्यवाही करत Trade Certificate च्या नियमांच उल्लंघन केल्यामुळे 100 पेक्षा जास्त Ola Showrooms बंद केले आहेत. या कार्यवाहीमुळे Ola Electric च Market Share कमी होण्याची भीती आहे, आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवरही होऊ शकतो.

Ola Electric एकेकाळी होत मार्केट लीडर पण आता का अडचणीत आल ?

Ola Electric ह्या कंपनीच भारतात Electric Two Wheeler क्षेत्रात एक मोठ नाव आहे. 2017 मध्ये भाविश अग्रवाल यांनी या कंपनीची स्थापना केली होती. 2024 च्या सुरुवातीला Ola Electric चा मार्केट शेअर 50 टक्क्यांहून जास्त होता, आणि कंपनीने एका वर्षात 4 लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. पण वर्षभरातच कंपनीची परिस्थिती बदलली. डिसेंबर 2024 मध्ये ओलाचा मार्केट शेअर 35 टक्क्यांवर आला, तर बजाज ऑटोचा शेअर 32 टक्के आणि टीव्हीएसचा 31 टक्के होता.

परंतु जानेवारी 2025 मध्ये जणू कंपनीला शनिच लागला कारण यावर्षीच्या सुरवातीलाच जानेवारी महिन्यामध्ये Bajaj आणि TVS ने Ola ला मागे टाकल, आणि ओला कंपनी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

या घसरणीमागे अनेक कारणं आहेत. कधी ओलाच्या स्कूटरमध्ये आग लागण्याच्या घटना, तर कधी Service आणि Parts च्या खर्चामुळे ग्राहकांच्या तक्रारी. आणि कंपणीची साडे-साती इथेच संपली नाही तर आता या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात RTO च्या कार्यावहीने सुद्धा ओलाच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकली आहे.

महाराष्ट्रात Ola वर RTO ने कार्यवाही का केली ?

महाराष्ट्रात Ola Electric वर RTO ने मोठी कार्यवाही केली आहे. या कार्यवाही अंतर्गत ओलाची 100 पेक्षा जास्त शोरूम बंद करण्यात आली आहेत, आणि अजून काही शोरूम बंद होण्याची शक्यता आहे. ही कार्यवाही का झाली? आणि त्यामागचं कारण काय आहे ? याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

  • Trade Certificate नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
हे वाचल का ? -  सोन्याचा दर ₹60,000 च्या खाली जाणार? जाणून घ्या कारणं! आता मिस्ड कॉलवर मिळवा आजचे सोने दर – बघा नंबर!

RTO च्या मते,Ola Electric ने कायद्याचं उल्लंघन करत अनेक Showrooms आणि Service Centers ट्रेड सर्टिफिकेट शिवाय चालवली. Central Motor Vehicle Act 1988 आणि Central Motor Vehicle Rule 1989 च्या नियम 33 आणि 35 नुसार, प्रत्येक शोरूम किंवा स्टोअरकडे स्वतःचं ट्रेड सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. हे सर्टिफिकेट वाहनांच्या विक्रीसाठी, प्रदर्शनासाठी आणि टेस्ट राइडसाठी आवश्यक आहे.

पण Ola च्या बाबतीत असं आढळलं की, Ola Electric चे पूर्ण महाराष्ट्रात १४६ शोरूम बिना ट्रेड सर्टिफिकेट शिवाय चालविल्या जात होते. यावर महाराष्ट्र RTO ने कार्यवाही करत ७५ शोरूम बंद केले आणि उरलेल्या १०९ शोरूम्स ला कारणे दाखवा (Show Cause) नोटिस जारी केल्या आहेत.

  • रजिस्ट्रेशनशिवाय गाड्यांची विक्री

ओलावर असा आरोप आहे की त्यांनी रजिस्ट्रेशनशिवाय अनेक गाड्या विकल्या आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये ओलाने सांगितलं की त्यांनी 25,000 स्कूटर विकल्या, पण Vahan Portal च्या डेटानुसार फक्त 8,647 स्कूटरचं रजिस्ट्रेशन झालं. उरलेल्या स्कूटरचं रजिस्ट्रेशन न झाल्याने ओलावर कारवाई झाली. याआधी पंजाब आणि जबलपूरमध्येही अशाच कारणांमुळे ओलाची शोरूम बंद करण्यात आली होती.

  • तक्रारी आणि चौकशी

मार्च 2025 मध्ये गुरुग्राममधील प्रीतपाल सिंग अँड असोसिएट्स या कंपनीने ओलाविरोधात तक्रार केली. त्यांनी आरोप केला की ओला इलेक्ट्रिक ट्रेड सर्टिफिकेटशिवाय शोरूम आणि सर्विस सेंटर्स चालवत आहे. या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, महाराष्ट्रातील 55 शहरांमधील ओलाच्या शोरूम्सवर छापे टाकण्यात आले. या तपासणीत ओलाच्या 95% पेक्षा जास्त शोरूम्सकडे ट्रेड सर्टिफिकेट नसल्याचं आढळलं.

  • आरटीओची पुढची कारवाई

16 एप्रिल 2025 रोजी जॉईट ट्रान्सपोर्ट कमिशनरने एक पत्र जारी केलं, ज्यात ओलावर पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले:

  • 121 शोरूम्स ट्रेड सर्टिफिकेटशिवाय चालत असल्याचं सिद्ध झालं.
  • 75 शोरूम्स तात्काळ बंद करण्यात आली.
  • बाकी शोरूम्स स्थानिक आरटीओने तपासून बंद करावीत.
  • 192 ओला इलेक्ट्रिक स्कूटर ताब्यात घेण्यात आल्या.
  • 109 शोरूम्सना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली.
हे वाचल का ? -  अमरनाथ यात्रा 2025: 14 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन सुरू, कशी आहे प्रोसेस जाणून घ्या सगळी माहिती

या नोटीसमध्ये ओलाला खालील माहिती देण्यास सांगितलं आहे:

  • गेल्या तीन वर्षांत देशभरात उघडलेल्या शोरूम आणि सर्विस सेंटर्सची संख्या.
  • मिळालेल्या ट्रेड सर्टिफिकेट्सची माहिती आणि त्यांच्या तारखा.
  • फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्रात विकलेल्या स्कूटर मॉडेल्स आणि त्यांचे डिटेल्स.
  • रजिस्ट्रेशनशिवाय किती गाड्या स्टोअर केल्या आहेत.

ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे काय?

आतापर्यंत तुम्ही ट्रेड सर्टिफिकेट हा शब्द खूप वेळ ऐकला पण हे ट्रेड सर्टिफिकेट नक्की काय आहे ? याबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर तुमच्या माहितीसाठी Trade Certificate हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो वाहन निर्माता (Manufucturer) आणि डीलर्सना वाहनांच्या प्रदर्शनासाठी, विक्रीसाठी आणि टेस्ट राइडसाठी आवश्यक आहे.

Central Motor Vehicle Act 1988 आणि Central Motor Vehicle Rule 1989 मधील नियम 33 नुसार वाहन निर्माता आणि डिस्ट्रीब्युटरला ट्रेड सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि नियम 35 नुसार प्रत्येक शोरूम किंवा स्टोअरकडे स्वतःचं ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि जर यांच्याकडे Trade Certificate नसेल तर उपरोक्त नियमावलीतील Section 192 नुसार कार्यवाही होऊ शकते.

ट्रेड सर्टिफिकेट नसल्यास शोरूमला वाहनांची विक्री, प्रदर्शन किंवा टेस्ट राइड देण्याची परवानगी नसते. ओलाच्या बाबतीत असं आढळलं की त्यांच्या 95% पेक्षा जास्त शोरूम्सकडे हे सर्टिफिकेट नव्हतं. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली.

या सगळ्या कार्यवाही वर Ola Electric च स्पष्टीकरण

या कार्यवाही ओला इलेक्ट्रिकने 25 एप्रिल 2025 रोजी आपलं स्पष्टीकरण दिल. Ola Electric कंपनीने असं म्हटलं की “आम्हाला महाराष्ट्रात शोरूम बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही, आम्ही या प्रकरणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही आधी गाड्या विकल्या आणि नंतर त्यांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे हा सर्व गोंधळ झाला आहे.”

याआधीही ओलाने असं म्हटलं होतं की त्यांच्यावर करण्यात आलेली कार्यवाही चुकीची आणि पक्षपाती आहे. पण आरटीओच्या तपासणीत स्पष्ट झालं की ओलाने कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

हे वाचल का ? -  पहेलगाम हल्ल्यानंतर भारत POK ताब्यात घेणार ? पाच महत्त्वाची कारणं जाणून घ्या

या सगळ्या कार्यवाही काय परिणाम होऊ शकतात?

महाराष्ट्रात ओला इलेक्ट्रिकवर झालेली कार्यवाही ही कंपनीसाठी मोठा धक्का आहे. ट्रेड सर्टिफिकेटच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 100 पेक्षा जास्त शोरूम बंद झाले, आणि याचा थेट परिणाम ग्राहकांवर आणि कंपनीच्या मार्केट शेअरवर होणार आहे. आधीच मार्केट शेअर कमी होत असताना ही कार्यवाहीओलासाठी डोकेदुखी ठरली आहे. पण जर कंपनीने आपल्या सर्विस मध्ये सुधारण केली आणि कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन केल तसेच ग्राहकांचा विश्वास परत मिळवला, तर कंपनी पुन्हा मार्केट लीडर बनू शकते.

या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ओलाच्या शोरूम बंदीमुळे तुम्हाला काही अडचणी आल्या आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment