महाराष्ट्र: फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल केले असून, या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणे आता अधिक सोपे होणार आहे.
बोर्डाच्या नव्या नियमांनुसार यंदा अनुत्तीर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी राहणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासक्रम समजून घेत नियमित तयारी केली, तर चांगले गुण मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे.
नेमके बदल काय झाले?
दहावीकरता त्रिभाषिक सूत्र लागू
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून एकूण १०५ गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण ठरणार.
उदा. एखाद्या विद्यार्थ्याने एका विषयात ६५ आणि उरलेल्या दोन विषयांत २०-२० गुण मिळवले तरी तो पात्र ठरेल.
गणित व विज्ञानासाठी एकत्रित ७० गुण पुरेसे
यामुळे गणित व विज्ञान या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांमध्येही उत्तीर्ण होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
प्रश्नपत्रिका आणखी सोप्या
बोर्डाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विद्यार्थ्यांच्या आकलनाप्रमाणे सुटसुटीत केले असून, Objective प्रकारातील प्रश्नांचे प्रमाणही वाढवले आहे.
८०% पर्यंत गुण मिळवणेही शक्य!
शिक्षकांच्या मते, यंदाची परीक्षा ‘भीतीची परीक्षे’पेक्षा ‘आत्मविश्वासाची परीक्षा’ असणार आहे. अभ्यासाच्या योग्य नियोजनासह नियमित सराव केल्यास विद्यार्थी ८०% पर्यंत गुण मिळवू शकतात.
परीक्षांचे वेळापत्रक
बारावीची लेखी परीक्षा: १० फेब्रुवारीपासून
दहावीची लेखी परीक्षा: २० फेब्रुवारीपासून
प्रॅक्टिकल परीक्षा: लेखी परीक्षेपूर्वी घेण्यात येणार
बोर्डाच्या या नव्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी होत असून, अधिक आत्मविश्वासाने परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.







