आजकाल डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे PhonePe AutoPay फीचर अनेकांच्या नकळत ऑन झालेले दिसते.
यामुळे वापरकर्त्यांच्या सब्सक्रिप्शन, रिचार्ज, पॉलिसी, गेमिंग अँप्स, OTT, ट्रेडिंग अँप्स अशा विविध ठिकाणी खात्यातून परवानगीशिवाय पैसे कट होत आहेत.
अनेक लोकांना हे माहीतही नसते की त्यांनी AutoPay चालू ठेवले आहे, आणि महिन्याच्या शेवटी बँक स्टेटमेंट पाहताना त्यांना अनोळखी ट्रान्झॅक्शन दिसतात.
AutoPay सुरू ठेवण्याचे धोके
- नकळत महिन्याला पैसे कट होतात
- अनोळखी अँप्स/सब्स्क्रिप्शन्समुळे खाते रिकामे होऊ शकते
- फ्रॉड अँप्स AutoPay चा गैरवापर करू शकतात
- बँक बॅलन्स कमी झाल्यामुळे UPI/EMI/LIC पेमेंट्स फेल होऊ शकतात
- वयोवृद्ध व्यक्ती व मुलांच्या खात्यांमधूनही पैसे कट होण्याची शक्यता
म्हणून PhonePe मधील AutoPay सुरक्षितपणे बंद करणे फार महत्त्वाचे आहे.
PhonePe AutoPay कसे बंद करावे? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन)
- PhonePe अँप उघडा
- डाव्या कोपऱ्यातील तुमच्या Profile वर टच करा
- त्यानंतर Manage Payments वर टच करा
- ‘AutoPay’ पर्याय निवडा– येथे तुमच्या नावावर सुरू असलेले सर्व AutoPay दिसतील.
- संशयास्पद किंवा नको असलेला AutoPay निवडा– उदा. OTT, रिचार्ज, ट्रेडिंग, वॉलेट, पॉलिसी.
- ‘Cancel AutoPay’ किंवा ‘Deactivate’ वर क्लिक करा– तुमचा AutoPay तत्काळ बंद होईल.
- बँक एसएमएस व UPI मेसेज तपासा– रद्दीकरणाची खात्री करा.
महत्त्वाची सूचना
जर तुम्ही कधी अँप्स इंस्टॉल केले असेल, फ्री ट्रायल घेतले असेल किंवा चुकून AutoPay स्वीकारले असेल, तर ते तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कट करत राहते.
म्हणून लगेच PhonePe मधील AutoPay तपासून नको असलेले सर्व AutoPay आजच बंद करा.
Times Marathi सूचना
तुमची आर्थिक सुरक्षा सर्वात महत्त्वाची.
AutoPay सेटिंगवर दर महिन्याला एकदा तपासणी करा आणि नको असलेले सब्स्क्रिप्शन ताबडतोब बंद करा.







