जालना, 23 सप्टेंबर 2025 – अमोना (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील ग्रामस्थांनी डोलखेडा धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, जालना यांच्याकडे औपचारिक अर्ज सादर केला. या अर्जावर ग्रामस्थांनी गावातील अडचणींचे विस्तृत वर्णन केले असून, ठोस कारवाईची मागणी केली आहे .
समस्या अधोरेखित:
धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेतजमिनी व रस्त्यांचे नुकसान.
सावरखेड, गोंधनखेड, सिपोरा, वारुड यांसारख्या गावांशी संपर्क तुटला.
400 ते 500 हेक्टर क्षेत्र धोक्यात.
विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
प्रमुख मागण्या:
बॅकवॉटरची योग्य विल्हेवाट लावावी.
कायमस्वरूपी पूल बांधून देण्यात यावा.
तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने सर्वेक्षण व Action Plan आखण्यात यावा.
निवेदनाची प्रत मिळालेल्या मान्यवरांची नावे, या अर्जाची प्रत अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये :
मा. पंकजाताई मुंढे, पालकमंत्री, जालना जिल्हा
मा. प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री, भारत सरकार
मा. मकरंद पाटील, पालकमंत्री बुलढाणा जिल्हा
मा. श्वेताताई महाले, आमदार, चिखली विधानसभा मतदारसंघ
मा. मनोज कायंदे, आमदार, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ
मा. संतोष दानवे, आमदार, भोकरदन विधानसभा मतदारसंघ
मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
मा. पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा
मा. पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना
मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, जाफ्राबाद
मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन, टेंभुर्णी
मा. कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलढाणा
मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, चिखली
मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन, अंढेरा
तसेच विभागीय व जिल्हा स्तरावरील विविध अधिकारी यांचा समावेश आहे .
ग्रामस्थांचा इशारा
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून मागण्या मांडल्या असूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या वेळेस 30 सप्टेंबर 2025 पर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .