संतापजनक: ज्येष्ठ कीर्तनकार आणि भाजप नेते श्री मधुकरराव वाघ यांचे मोठे नुकसान; १५ एकर मक्याची सुडी पेटवली, घटना सीसीटीव्हीत कैद ?

अमोना | विशेष प्रतिनिधी

WhatsApp Group Join Now

अमोना (ता. चिखली) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी (सुडी) समाजकंटकांनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या शेताचे नुकसान केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्तः

अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्याा अमोना शिवारातील गट नंबर ४२ व ४३ मध्ये ही घटना घडली. शेतकरी श्री. मधुकरराव वाघ यांनी आपल्या १५ एकर शेतातील मक्याचे पीक काढून मजुरांच्या साहाय्याने त्याची सुडी लावून ठेवली होती. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी या सुडीला आग लावून ती पेटवून दिली. शेतात गेल्यानंतर हा प्रकार शेतकऱ्याच्या निदर्शनास आला.

या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सोनकांबळे साहेब आणि  जाधव साहेब आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

याप्रकरणी शेतकरी मधुकरराव वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२६ (फ) (शेतमालाचे आगीने नुकसान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे वाचल का ? -  बुलढाणा ब्रेकिंग: सहकार क्षेत्र हादरले! जिल्ह्यातील १३ पतसंस्थांचा 'परवाना' कायमचा रद्द होणार; पहा तुमची पतसंस्था तर नाही ना या यादीत?

Join WhatsApp

Join Now