बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्याची सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया (2025 मार्गदर्शक)

Hand holding Aadhaar card in front of a laptop screen showing Aadhaar–Bank Mapping confirmation and a bank passbook, with TIMEMARATHI.COM watermark in the top-right corner.

सरकारी योजनेचे लाभ, सबसिडी आणि DBT रक्कम वेळेवर खात्यात जमा व्हावी यासाठी बँक खाते आणि आधार नंबर लिंक करणे आवश्यक आहे. खाते उघडताना आधार लिंक केले नसेल, तर तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सहज पूर्ण करू शकता.

WhatsApp Group Join Now

बँक खाते आधार लिंक झाले आहे का? ऑनलाइन स्टेटस तपासा

आपले खाते आधीच आधारशी जोडले आहे का हे UIDAI च्या अधिकृत पोर्टलवर तपासता येते.

  1. UIDAI च्या Bank Mapping पेजला भेट द्या — अधिकृत लिंक
  2. Login वर क्लिक करा
  3. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा टाका
  4. Send OTP वर क्लिक करा
  5. मोबाईलवर आलेला OTP टाकून Login करा

जर तुम्हाला —
“Congratulations! Your Aadhaar-Bank Mapping has been done.”
असा संदेश दिसला आणि Bank Seeding Status: Active असे दिसले, तर तुमचे खाते आधीच लिंक झाले आहे.

जर Active दिसत नसेल, तर तुम्हाला लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्याची प्रक्रिया

ही प्रक्रिया NPCI च्या अधिकृत पोर्टलमार्फत करता येते.

  1. NPCI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. Consumer टॅब निवडा
  3. Bharat Aadhaar Seeding Enabler वर क्लिक करा
  4. Request for Aadhaar Seeding फॉर्म भरा:
    • आधार क्रमांक
    • तुमच्या बँकेचे नाव
    • Seeding Type
    • Bank Account Number
    • Captcha
  5. फॉर्म सबमिट करा

सबमिट केल्यानंतर तुमचे Aadhaar–Bank Seeding प्रोसेसिंग सुरू होते.

ऑफलाईन पद्धत (पर्यायी पर्याय)

जर तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जाऊन प्रक्रिया करायची असेल, तर:

  • आधार कार्ड (प्रमाणित प्रत)
  • बँक पासबुक/खाते क्रमांक
  • बँकेचा Aadhaar Seeding फॉर्म

भरून सबमिट करा. बँक अधिकारी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देतात.


ही प्रक्रिया का महत्त्वाची आहे?

  • DBT सबसिडी वेळेवर मिळते
  • सरकारी योजना खात्यात थेट जमा होतात
  • KYC अपडेट होऊन खाते सुरक्षित राहते
हे वाचल का ? -  Scam Alert: PhonePe ची 'ही' Settings बंद करा , नाहीतर तुमचे पैसे गेलेच म्हणून समजा!

Join WhatsApp

Join Now