प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीचा आकडा आला समोर! वाचून थक्क व्हाल

प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीचा आकडा आला समोर! वाचून थक्क व्हाल

वृंदावनातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल आजकाल खूप चर्चा आहे. त्यांच्या भक्तांची संख्या कोट्यवधी आहे, आणि त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. पण सध्या त्यांच्या संपत्ती आणि खर्चाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. काही जणांना वाटत की, प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, तर काही जण म्हणतात की, त्यांच्याकडे काहीच नाही. मग खर काय आहे? प्रेमानंद महाराज यांनी स्वतः याबद्दल काय सांगितलं आहे? आणि त्यांच्या आश्रमाचा खर्च कसा चालतो? याबाबत आपण सगळा सविस्तर आढावा घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now

प्रेमानंद महाराज कोण आहेत?

प्रेमानंद महाराज यांच खर नाव अनिरुद्ध कुमार पांडे आहे, हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचा जन्म 30 मार्च 1969 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील अखरी गावात झाला. त्यांचे वडील शंभू पांडे आणि आई रमा देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब शेती करायच, आणि त्यांचे आजोबा एक सन्यासी होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक वातावरणाचा प्रभाव होता. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी घर सोडल आणि सन्यास घेतला.

त्यानंतर त्यांनी काशी आणि वृंदावनात भक्ती आणि साधनेत वेळ घालवला. आज ते राधावल्लभ संप्रदायाचे अनुयायी आहेत आणि वृंदावनातील श्री हित राधा केली कुंज आश्रमात राहतात. त्यांचे सत्संग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत, आणि त्यांचे इन्स्टाग्रामवर 1 कोटी 11 लाख फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर 78 लाख 80 हजार सबस्क्रायबर्स आहेत.

प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीची चर्चा

प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. काही लोकांना वाटत की, त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांना अनेकदा महागड्या गाड्यांमध्ये पाहिल गेलआहे, आणि त्यांच्या आश्रमाच्या आजूबाजूला असलेल्या जमिनी आणि फ्लॅट्सची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे, अस काही जणांच म्हणण आहे.

हे वाचल का ? -  फँड्री चित्रपटातील अभिनेत्री Rajeshwari Kharat ने केला धर्म बदल !

प्रेमानंद महाराज यांनी स्वतः याबाबतीत एका मुलाखतीत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे कोणतीही वैयक्तिक संपत्ती नाही. त्यांच्या नावावर ना कोणत बँक खात आहे, ना कोणती जमीन, घर किंवा फ्लॅट आहे. ते म्हणाले, “मी एक साधु जीवन जगतो. जर कोणी मला 10 रुपयेही मागितले, तर माझ्याकडे ते देण्यासाठीही काही नाही.”

वृंदावनातील प्रेमानंद महाराज यांचा आश्रम आणि त्याचा खर्च

प्रेमानंद महाराज वृंदावनातील श्री हित राधा केली कुंज आश्रमात राहतात. हा आश्रम रमणरेती परिसरात आहे, आणि या आश्रमाचा खर्च त्यांचे भक्त आणि दानातून मिळणाऱ्या पैशांमधून चालतो. काही अहवालांनुसार, या आश्रमाच्या आजूबाजूला असलेल्या जमिनी आणि फ्लॅट्सची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. पण या सगळ्या गोष्टी आश्रमाच्या ट्रस्टच्या नावावर आहेत, प्रेमानंद महाराज यांच्या वैयक्तिक नावावर नाहीत.

आश्रमाचा रोजचा खर्च भक्तांच्या देणगीतून चालतो. माझ्या एका नातेवाईकाने सांगितल की, त्याने वृंदावनात प्रेमानंद महाराज यांचा आश्रम पाहिला, आणि तिथे खूप साधी राहणी आहे. प्रेमानंद महाराज यांनी स्वतः सांगितल आहे की, त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही संपत्ती नाही, आणि ते फक्त भक्ती आणि साधनेत आपल जीवन व्यतीत करतात.

प्रेमानंद महाराज यांच साध जीवन

प्रेमानंद महाराज यांच जीवन खूप साध आहे. त्यांनी स्वतः सांगितल आहे की, त्यांच्या आयुष्यात असेही दिवस आले, जेव्हा त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नव्हते. वृंदावनातील काली देह परिसरात त्यांनी एकदा भोजनासाठी कोणाकडे तरी मागितल होत, पण त्या दिवशी त्यांना पोटभर जेवणही मिळाल नाही. आज त्यांच्याकडे कोट्यवधी भक्त आहेत, आणि त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी रात्रीच्या वेळी शेकडो भक्त येतात. पण त्यांनी आपल साध जीवन कायम ठेवल आहे. आणि त्यांच हे साधेपण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रेमानंद महाराज यांचे भक्त आणि प्रभाव

प्रेमानंद महाराज यांचे भक्त देशभरात आणि जगभरात आहेत. त्यांच्या भक्तांमध्ये सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेत्री हेमा मालिनी, कुस्तीपटू ग्रेट खली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांसारख्या व्यक्तींनीही त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. प्रेमानंद महाराज यांचे सत्संग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील फॉलोअर्सची संख्या त्यांच्या प्रभावाची साक्ष देते.

हे वाचल का ? -  Digital Arrest म्हणजे काय ? याच्यापासून कसे वाचायचे ? वाचा सविस्तर माहिती

प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीइतकीच त्यांच्या आरोग्याचीही चर्चा आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या गेल्या 18 वर्षांपासून खराब आहेत, आणि ते डायलिसिसवर आहेत. अनेक भक्तांनी त्यांना आपली किडनी देण्याची तयारी दाखवली, पण प्रेमानंद महाराज यांनी ती नाकारली. ते म्हणाले की, “मला कोणालाही त्रास द्यायचा नाही.” त्यांच्या या निःस्वार्थी स्वभावामुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.

प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीच्या अफवा आणि त्याबाबत सत्यता

प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल काही अफवा पसरल्या आहेत की, त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, आणि ते महागड्या गाड्यांमध्ये फिरतात. पण त्यांनी स्वतः याचा खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. काही वेळा ते ज्या गाड्यांमध्ये दिसतात, त्या गाड्या त्यांच्या भक्तांच्या असतात. त्यांचा आश्रम आणि इतर गोष्टी श्री हित राधा केली कुंज ट्रस्टच्या नावावर आहेत, आणि त्याचा उपयोग भक्तांच्या सेवेसाठी होतो.

प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणतीही वैयक्तिक संपत्ती नाही, हे त्यांनी स्वतः स्पष्ट केल आहे. त्यांच जीवन साधेपण आणि भक्तीने भरलेल आहे, आणि ते आजही आपल्या भक्तांना सत्य आणि भक्तीचा मार्ग दाखवत आहेत. त्यांचा आश्रम आणि खर्च भक्तांच्या देणगीतून चालतो, आणि त्याचा उपयोग भक्तांच्या सेवेसाठी होतो. प्रेमानंद महाराज यांच साध जीवन आणि निःस्वार्थी स्वभाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment