आजकाल आधार कार्ड आणि बँक खात लिंक करण खूप महत्त्वाच झाल आहे. सरकारने अनेक योजना आणि सेवा आधारशी जोडल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल, तर तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. पण अनेक जणांना अस वाटत की यासाठी बँकेत जाव लागेल, पण आता तस नाही! बँकेचे कर्मचारी सुद्धा सांगतात की तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाइलवरून हे काम करू शकता.
पण प्रश्न असा आहे की ही प्रक्रिया कशी करायची? जर तुम्हाला ही माहिती नाही, तर काळजी करू नका. मी तुम्हाला आधार कार्डला बँक खात लिंक करण्याची पूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे.
आधार कार्डला बँक खाते लिंक का करावे लागते ?
आधार कार्ड हे तुमची ओळख आहे आणि बँक खात तुमच्या आर्थिक व्यवहारांच साधन आहे. सरकारने या दोन्हीला जोडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तुम्हाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळू शकतो. उदा., पगार, पेन्शन किंवा इतर मदत थेट तुमच्या खात्यात येण्यासाठी Aadhar Seeding असणे गरजेच आहे.
जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यातून पैसे काढण किंवा व्यवहार करण कठीण होऊ शकत. शिवाय, काही बँका आता आधार नसलेल्या खात्यांवर पेनल्टी लावतात. म्हणूनच ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण महत्त्वाच आहे. आणि आता ही प्रक्रिया बँकेत जाण्याची गरज नसलेली आहे, जी तुमच्यासाठी खूप सोयीची आहे.
हे वाचल का ? – घरबसल्या जॉब कार्ड कस काढायचं? संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत
आधार कार्डला बँक खाते लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
सर्वप्रथम, तुमचा मोबाइल उघडा आणि त्यात गुगल ब्राउझर ओपन करा. गुगलच्या सर्च बारमध्ये “NPCI” अस टाइप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाइट दिसेल, जी अधिकृत NPCI (National Payement Corporation India) वेबसाइट आहे. या वेबसाइटवर क्लिक करा.
या वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला “Consumer” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा आणि मग “Bharat Aadhar Seeding Enabler” या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील.
या नवीन पेजवर तुम्हाला “Aadhaar Seeding/Deseeding” हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली “Request for Aadhaar” असा पर्याय दिसेल.
आता “Seeding” आणि “De-Seeding” या दोन पर्यायांमध्ये तुम्हाला “Seeding” निवडायच आहे. Seeding म्हणजे आधार कार्डला बँक खात Link करण, तर डिसीडिंग म्हणजे आधी लिंक असलेल खात Unlink करण. जर तुमच खात आधी लिंक नसेल, तर “सीडिंग” निवडा.
सीडिंग पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला बँकेच नाव निवडायच आहे. ही एक खास गोष्ट आहे की आता या वेबसाइटवर जवळजवळ सर्व बँकांच नाव उपलब्ध आहे. पूर्वी फक्त काही बँकांच नाव होत, पण आता 99% बँका या यादीत आहेत. उदा., स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, किंवा इतर कोणतीही बँक निवडा.
बँक निवडल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील: “Fresh Seeding”, “Same bank with another account”, आणि “from one bank to other bank”. जर तुमच खात आधी लिंक नसेल, तर “Fresh Seeding” निवडा. जर तुमच्याकडे एकाच बँकेत दोन खाती असतील आणि दुसऱ्या खात्याला लिंक करायच असेल, तर दुसरा पर्याय निवडा. तिसरा पर्याय जेव्हा एका बँकेच खात अनलिंक करून दुसऱ्या बँकेला लिंक करायच असेल, तेव्हा वापरा.
“Fresh Seeding” निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. खाते क्रमांक टाकल्यानंतर तो पुन्हा Confirm करा, जेणेकरून चूक होणार नाही. मग खालील कॅप्चा कोड टाका आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
सबमिट केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक सहा अंकी ओटीपी येईल. हा ओटीपी काळजीपूर्वक टाका आणि “Confirm” बटणावर क्लिक करा. ओटीपी कन्फर्म झाल्यावर तुमच आधार कार्ड आणि बँक खातं यशस्वीपणे लिंक होईल.
लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यास 48 तास लागू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याचा स्टेटस तपासू शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण खूप सोप आहे आणि त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा सायबर कॅफेवर पैसे देण्याची गरज नाही.
आधार कार्ड लिंकिंगचा स्टेटस कसा तपासायचा?
आधार कार्ड आणि बँक खात लिंक झाल की नाही, हे तपासणंही महत्त्वाच आहे. यासाठी तुम्ही पुन्हा एनपीसीआय वेबसाइटवर जा आणि “आधार सीडिंग स्टेटस” पर्याय निवडा. तिथे तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून स्टेटस चेक करू शकता.
जर तुम्हाला प्रक्रियेत काही अडचण येत असेल, तर कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला मदत करेन. तुमच लिंकिंग यशस्वी झाल्यावर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन खात्याची माहिती तपासू शकता.
या प्रक्रियेचे फायदे आणि सावधानता
ही ऑनलाइन प्रक्रिया तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला बाहेर पडण्याची गरज नाही आणि पैशांची बचत होते. शिवाय, ही प्रक्रिया सुरक्षित आहे, कारण तुम्हाला ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन कराव लागत.
पण काही गोष्टींची काळजी घ्या. नेहमी अधिकृत वेबसाइट वापरा आणि कोणत्याही सशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी कोणाशी शेअर करू नका, कारण त्यामुळे तुमच्या खात्याला धोका होऊ शकतो.