२०५० पर्यंत अर्ध्या जगाला लागणार चष्मा? कारण ऐकून बसेल धक्का !

कधी असं वाटतं का, की हल्ली लांबचं बघताना डोळ्यांवर ताण येतो? मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर वाढल्यामुळे ही समस्या वाढते आहे. संशोधन सांगतं, की २०५० पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकांना चष्म्याशिवाय नीट दिसणारच नाही! ही स्थिती म्हणजेच ‘मायोपिया’ – आणि आज आपण हाच विषय समजून घेणार आहोत. की हा मायोपिया नेमका काय आहे आणि तो कश्यामुळे होतो.

२०५० पर्यंत अर्ध्या जगाला का लागणार चष्मा?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने या संस्थेने डोळ्यांविषयी नुकताच एक अहवाल दिला आहे कि, सध्याच्या डिजिटल काळातील लोकांची अवस्था पाहून असे अंदाज निघतो कि, येणाऱ्या 20-25 वर्षांनी म्हणजेच २०५० पर्यंत जगातील ५० टक्के लोकांना बिना चष्म्याचं पाहन शक्य होणार नाही.

कारण आपण सकाळी उठतो, आणि आपली पहिली नजर जाते ती मोबाइलच्या स्क्रीनकडे… दिवसभर डोळ्यांसमोर चमकणारे लाइट, स्क्रीनवरील अक्षरं, सततचा एक ताण! यातल्या काही गोष्टींचा त्रास आपल्याला जाणवतही नाही, पण ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या डोळ्यांवर खूप मोठा परिणाम होतोय.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही हे आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत, जस आपण आपल्या पत्नीला आपल्या आयुष्याची अर्धांगिनी म्हणतो तसचं माझ्या मते आपण आपल्या मोबाईल ला सुद्धा अर्धांगिनीचा दर्जा द्यायची वेळ आलेली आहे. हे वाक्य एक वाचताना एक विनोदी स्वरूपाचे वाटते पण सध्यस्थितीत 24 तासांपैकी 10-15 तास आपला मोबाईल आपल्या सोबतच असतो. आणि ह्या मोबाईल च्या स्क्रीन कडे पाहता-पाहता आपल्या डोळ्यांचा धिंगाणा होत चालला आहे. सध्यस्थितीत डोळ्यांच्या आरोग्याची चर्चा होणं ही काळाची गरज झालेली आहे. हे ऐकून खूप वाईट वाटते पण अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यांवर ह्या टेक्नॉलॉजीचा वाईट परिणाम होत चालला आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने दिलेला अंदाज म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी एक ‘रेड अलर्ट ‘ आहे – २०५० पर्यंत जगातील ५०% लोक मायोपियाने ग्रस्त असतील! अस त्यांनी त्यांच्या संशोधनामध्ये सांगितले आहे.

मायोपिया म्हणजे काय – समजून घ्या अगदी सोप्या भाषेत

मायोपिया म्हणजे आपण जस-जसं थोड लांब पाहतो, तस-तस आपल्याला समोरच दृश्य पुसट म्हणजेच अस्पष्ट दिसल्या सारख वाटत. जर एखाद्या वेळेस आपण घराच्या गॅलरीतून किंवा एखाद्या उंच ठिकाणावरून खाली पाहिलं कि, आपल्याला झाडं, वाहने, माणसं नीट दिसत नाहीत. पण मोबाईल किंवा पुस्तक जर जवळ घेतलं की सगळं स्पष्ट दिसत, यालाच आपण “अल्पदृष्टी” म्हणू शकतो.

यालाच आपण वैज्ञानिक भाषेत समजून घायचं म्हणल तर – आपल्या डोळ्याचा आकार सामान्यापेक्षा थोडा लांबट असतो, त्यामुळे प्रकाश डोळ्याच्या रेटिनावर न बसता थोडा आधीच एकत्र होतो, आणि यामुळे लांबची दृश्यं अस्पष्ट वाटतात.

आपल्याला मायोपिया आहे कि नाही कसे ओळखायचे ?

1) दूर पाहताना अस्पष्ट दिसणे – आपल्याला अगदी १०-१५ फुटांपेक्षा जास्त दूरच लिहिलेलं वाचता न येणं, रस्त्यावरचे साइन बोर्ड किंवा टीव्हीवरील मजकूर नीट न दिसणं, ही मायोपियाची प्राथमिक लक्षणं असू शकतात.

2) डोळ्यांत वारंवार थकवा किंवा वेदना जाणवणे – दिवसा अखेरीस डोळे जड पडल्यासारखं वाटण, स्क्रीनकडे पाहताना आपल्याला डोळ्यावर ताण आल्यासारखं जाणवणं, किंवा डोळ्याभोवती जळजळ होणं हे मायोपियामुळे होऊ शकतं.

3) डोळे चोळणे, पाणी येणे – आपल्या डोळ्यांवर सतत ताण आला की आपण डोळे चोळतो, हेच आपण जर सतत करत राहलो तर आपल्याला डोळे चोळण्याची सवय लागते. कधी कधी डोळे लाल होतात किंवा पाण्याने भरून येतात.

4) डोळ्यांजवळ वस्तू नेण्याची सवय होणे – पुस्तक, मोबाईल किंवा कोणतीही वस्तू जर डोळ्याच्या एकदम जवळ घेऊनच पाहण्याची सवय जर आपल्याला लागली तर ही एक महत्त्वाची चेतावणी असते की आपली दृष्टी कमजोर होत आहे.

५) डोकेदुखी – विशेषतः स्क्रीनकडे पाहिल्यानंतर – सतत Mobile, TV किंवा Laptop च्या स्क्रीनकडे सारख पाहत राहिल्याने सुद्धा डोळ्यांवर ताण येतो आणि त्याचा परिणाम डोकेदुखी मध्ये होतो. ही डोकेदुखी सामान्यतः कपाळावर किंवा डोळ्यांच्या वरच्या भागात जाणवते.

जर या लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणं तुम्हाला जाणवत असतील, तर तुमच्या डोळ्यांची वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. कारण लक्षणे भासवण्याचा सुरवातीसच तुम्ही तपासण्या किंवा उपचार केले तर मायोपिया वाढण्यापासून रोखता येतो.

हे सुद्धा वाचा :- विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी केंद्र सरकारने वाढवला सामग्री खर्च 

मायोपिया बाबत काही धक्कादायक आकडेवारी

२०२३ पर्यंत जगातील ३०% लोक मायोपियाने ग्रस्त झालेले होते, तर अमेरिकेत तब्बल ४०% लोकांच्या डोळ्यांवर मायोपियाचा परिणाम झाला आहे. आणि ही संख्या येथेच थांबत नाही तर २०५० पर्यंत सुमारे ५ अब्ज लोक मायोपियाचे बळी होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे.

हे आकडे पाहताना आपल्याला कदाचित वाटेल – “हे तर भविष्याचे अंदाज आहेत”, पण खरं तर हे आकडे आपल्या आजच्या जीवनशैलीचे प्रतिबिंब आहेत. आपण सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांच्यावर अवलंबून राहतो, दिवसभर घरात राहतो, नैसर्गिक प्रकाश टाळतो – आणि हीच आपली वाईट सवय आपल्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. डोळ्यांची दृष्टी ही आपल्यासाठी निसर्गाची अनमोल भेट आहे. पण आपणच आपल्या हाताने त्या अनमोल भेटेच वाटोळ करण्याच्या मार्गाने जात आहे.

याचा अर्थ असा नाही की आपण टेक्नॉलॉजीपासून दूर जावं – तर तिला संतुलित वापरात आणणं आवश्यक आहे.
आज आपण जर थोडंसं आपल्या जीवन शैलीत थोडेसे बदल केले तर येणाऱ्या काळात आपल्याला आणि आपल्या मुलांना चष्म्याच्या काचातून नाही तर आपल्या स्वच्छ आणि सुंदर डोळ्यांनी नैसर्गिक दृष्टीचा अनुभव घेता येईल.

मायोपिया होण्यापासून कस वाटायचं ?

आतापर्यंत आपण आपण वाचल की, मायोपिया कश्यामुळे होतो आहे आणि त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात. परंतु एवढ वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल कि आता ह्या मायोपिया पासून कस वाचायचं ! तर घाबरू नका, खाली दिलेल्या बाबी व्यवस्थित वाचा आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करा, त्यामुळे तुम्ही मायोपिया होण्यापासून वाचू शकता

20-20-20 नियम पाळा

जर तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही पाहत असाल तर दर २० मिनिटांनी, २० फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे २० सेकंद पाहण्याची सवय लावून घ्या. त्याने तुमच्या डोळ्यांना थोडा आराम भेटेल आणि तुम्ही सुद्धा डोळ्यांना होणाऱ्या आजरापासून तुमचे संरक्षण करू शकाल.

नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवा

तुमच्या दैनंदिन जीवनात दररोज फक्त १-२ तास सूर्यप्रकाशात फिरा, खेळा किंवा चालणं करा. नैसर्गिक प्रकाश आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि फायदेशीर असतो. यामुळे सुद्धा तुम्ही तुमचे डोळे वाचवू शकता.

स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवा

सध्यस्थित उपरोक्त माहितीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेच की आपला मोबाईल आपल्या अर्धांगिनी सारखा झाला आहे ! आपला मोबईलच आपल्याला डोळे खराब करण्याच्या मार्गावर नेत आहे. त्यामुळे मोबईल वापरत असताना काही नियमांचे पालन करा आणि लहान मुलांचा Screen Time एकदम कमी करून टाका, शक्य झाल्यास फक्त १ तास मोबईल वापरल्यानंतर काही वेळ विश्रांती म्हणजेच डोळ्यांना आराम देण्यासाठी थोडा ब्रेक घेण्याची सवय लावा. आणि लहान मुलांसोबत धाकट्यानी सुद्धा ह्या नियमाचे पालन करा.

नेमका चष्मा वापरा

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या काही समस्या जाणवत असतील तर, दवाखान्यात जाऊन तुमच्या डोळ्यांची तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्लेने योग्य नंबरचा चष्मा वापरायला सुरुवात करा. कोणाकडूनही चुकीचा सल्ला घेऊन चुकीच्या नंबरचा चष्मा वापरण टाळा कारण चुकीच्या नंबरचा चष्मा वापरल्याने तुमच्या डोळ्यांचे अधिक नुकसान होऊ शकतो.

डोळ्यांसाठी पौष्टिक आहार

डोळ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं योग्य चष्मा घालणं किंवा स्क्रीन टाइम कमी करणं. आपले डोळे दिवसभर न थांबता आपल्यासाठी काम करत असतात — मग ते वाचन असो, मोबाईल वापरणं, किंवा गाडी चालवणं. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे.

आपल्या रोजच्या आहारात काही खास अन्नपदार्थांचा समावेश केल्यास डोळ्यांना आवश्यक पोषण सहज मिळू शकतं. उदाहरणार्थ, गाजर, पालक, ब्रोकली आणि आवळा हे डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर पदार्ध आहेत. हे अन्नद्रव्य डोळ्यांच्या पेशींना बळकट करून त्यांच संरक्षण करत आणि त्यांच्या नैसर्गिक कार्यक्षमतेतही सुधारणा करतं.

तसेच अंडी, बदाम, अळशीच्या बिया यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ फॅटी Acid असतं, जे डोळ्यांच्या सुकल्या सारख्या त्रासांपासून संरक्षण करतात. याशिवाय, व्हिटॅमिन A, C आणि E युक्त पदार्थ जसे डाळिंब, संत्री, मोसंबी किंवा सुकामेवा हे डोळ्यांच्या पेशींना नवे बळ देतात.

थोडक्यात सांगायच झालं, तर जेवण फक्त पोटासाठी नसून, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांसाठी सुद्धा असतं. त्यामुळे रोजच्या जेवणात हे पोषक घटक असलेले पदार्थ समाविष्ट करा.

डोळे दुखणे घरघूती उपाय

आपल्या डोळ्यांना आराम देण्यासाठी काही अगदी सोपे, पण प्रेमळ उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात सहज करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, थोडीशी थंड काकडी कापून डोळ्यांवर ठेवली की वेळाने डोळ्यांमध्ये गारवा जाणवतो. त्याचप्रमाणे, गुलाबजला मध्ये कॉटन भिजवून डोळ्यांवर ठेवल्यास थकवा तर कमी होतोच, पण मनही शांत होतं.

डोळे दुखणे थांबविण्यासाठी डोळ्यांना विश्रांतीही तितकीच महत्त्वाची असते डोळे बंद करून खोल श्वास घ्या, ह्यामुळे डोळ्यांना आणि मनालाही विश्रांती मिळते. त्यासोबतच, आहारात गाजर, पालक, आवळा, बदाम आणि अंडी यांचा समावेश करा. हे डोळ्यांना आतून बळकटी देतात.

डोळे जड होण्याची कारणे

डोळे जड वाटण्याची भावना ही हलकीसुद्धा असली तरी, ती रोजच्या जीवनात खूप अस्वस्थता निर्माण करू शकते. सकाळी उठल्यावर डोळे उघडताना जडसर वाटणं किंवा दिवसभर स्क्रीनसमोर बसल्यानंतर डोळ्यांमध्ये थकवा जाणवणं – ही लक्षणं आता सामान्य झाली आहेत. यामागे अनेक कारणं असू शकतात, आणि ती फक्त शारीरिकच नसून मानसिकदृष्ट्याही असतात.

सततचा मोबाईल, लॅपटॉप, किंवा टीव्हीचा वापर डोळ्यांना सतत काम करायला लावतो. आपण स्क्रीनकडे पाहताना एकसारख पाहतो त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि त्यामुळे जड वाटतात. झोपेचा अभावसुद्धा एक मोठं कारण आहे, कारण डोळ्यांनाही विश्रांतीचि आवश्यकता असते, आणि जर पुरेशी झोप मिळाली नाही तर डोळे लगेच थकतात.

कधी कधी डोळे जड होण्यामागे भावनिक थकवाही असतो तणाव, चिंता किंवा सततची विचारधार यामुळे आपल्या मेंदूवर आणि परिणामी डोळ्यांवर ताण येतो. याशिवाय अन्नातील पोषणतत्त्वांची कमतरता, विशेषतः व्हिटॅमिन A, B12, आणि ओमेगा-3 चा अभावसुद्धा डोळ्यांवर परिणाम होतो.

या सर्व गोष्टींना थोडंसं लक्ष दिलं, डोळ्यांना विश्रांती दिली, नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवला आणि भावनिक आरोग्याचीही काळजी घेतली, तर हे डोळ्यांचे जडपण सहज कमी होऊ शकतं. कारण डोळे हे आपल्या जगण्याचं दार आहेत त्यांची काळजी घेण आपले कर्तव्य आहे.

तुमच्या डोळ्यांचा तुमच्यावर हक्क आहे!

आपण आपल्या शरीराचा, मनाचा विचार करतो… पण डोळ्यांचा का विचार करत नाही ? कारण आपली दृष्टी गेल्यावरच त्याची किमत आपल्याला कळते. सध्या तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, अस समजा आपल्या डोळ्यांनी आपल्याला एक चान्स दिला आहे त्यामुळे आता वेळ आहे सजग होण्याची! सततची स्क्रीन, चुकीच्या सवयी, आणि आहारातील दुर्लक्ष – हे सगळं तुमच्या नजरेला अंधाराच्या दिशेने नेतं आहे. वरती लिहिलेल्या बाबींचा आपल्या जीवनात वापर करा आणि आपले डोळे सुरक्षित ठेवा आणि आजपासूनच एक वचन द्या – “माझे डोळे माझी जबाबदारी!”

आणि जसे तुम्हाला समजले की, तुमचे डोळे वाचविण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तस दुसऱ्यांना सुद्द्धा कळविण्यासाठी आमचा लेख इतरांना पाठवा त्याने इतरांना तर फायदा होईलच आणि त्याच बरोबर आमच्या भावना आणि इतक्या मेहनतीने लिहिलेला लेख इतरांचे आयुष्य अंधारात जाण्यापासून वाचेल. धन्यवाद !

हा लेख इतरांना WhatsApp वर पाठविण्यासाठी खालील बटनाचा वापर करा.

📲 WhatsApp वर शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत